GAIL India Share Price | मजबूत परतावा आणि फ्री बोनस शेअर्स देऊन करोडपती करणारा सरकारी कंपनीचा शेअर, डिटेल्स पहा

GAIL India Share Price | सरकारी मालकीच्या नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी “गेल इंडिया’च्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमवून दिला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 22 वर्षात 6 रुपयांवरून 100 रुपयाच्या पार गेली आहे. या कालावधीत गेल इंडिया कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना एकूण पाच वेळा बोलशील वाटप केले आहे. सर्व बोनस शेअर्सची बेरीज करून परताव्याची गणना केली, तर आपल्याला समजेल की ज्या लोकांनी 22 वर्षांपूर्वी गेल इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून एक कोटी रुपये पेक्षा जास्त झाले आहे. शेअर बाजारातील तज्ञ गेल इंडिया कंपनीच्या शेअर बाबत उत्साही असून त्यांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३) शेअर 0.95% वधारून 96 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GAIL India Share Price | GAIL India Stock Price | BSE 532155 | NSE GAIL)
एक लाखावर एक कोटी परतावा :
21 सप्टेंबर 2001 रोजी गेल इंडियाचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 5.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 जानेवारी 2023 रोजी या सरकारी मालकीच्या नवरत्न कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 107 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 21 सप्टेंबर 2001 रोजी गेल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 16977 शेअर्स मिळाले असते. गेल इंडिया कंपनीने 2001 पासून 2022 पर्यंत एकूण 5 वेळा बोनस शेअर्सचे वाटप केले आहेत. जर बोनस शेअर्सची बेरीज केली तर तुमच्या शेअर्सची एकूण संख्या 135810 शेअर्स झाली असती. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी गेल इंडिया कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के घसरणीसह 99.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 99.45 रुपये या किमती नुसार तुमच्या 135810 शेअरचे मूल्य 15,495,304.5 रुपये झाले असते.
गेल इंडियाचे बोनस शेअर्स लाभ :
गेल इंडिया कंपनीने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना एकूण पाच वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. ऑक्टोबर 2008 मध्ये 1 : 2 या प्रमाणात, मार्च 2017 मध्ये 1 : 3 या प्रमाणात, मार्च 2018 मध्ये 1 : 3 या प्रमाणात, जुलै 2019 मध्ये 1 : 1 या प्रमाणात, सप्टेंबर 2022 मध्ये 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते.
गेल इंडिया स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
शेअर बाजारातील तज्ञांनी ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी गेल इंडिया कंपनीच्या शेअर्ससाठी 145 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. मागील तीन महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सचे कमी पीई आणि उत्तम आरओआई आहे. पोर्टफोलिओसाठी गेल इंडिया स्टॉक एक आदर्श स्टॉक आहे. गेल इंडियाच्या शेअर्सवर तज्ञांनी बाय रेटिंग देऊन दीर्घकाळासाठी शेअर्स ठेवण्याचा सल्ला दिला आहे. गेल इंडियाचे शेअर्स काही महिन्यात 122-125 रुपये पर्यंत वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 2023 च्या शेवटपर्यंत ‘गेल इंडिया’ कंपनीचे शेअर्स 145 रुपये पर्यंत जाऊ शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | GAIL India Share Price 532155 stock market live on 01 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल