18 November 2024 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Gayatri Highways Share Price | शेअरची किंमत फक्त 1 रुपया, अल्पावधीत देईल 100% परतावा, चॉकलेट पेक्षा स्वस्त शेअर

Gayatri Highways Share Price

Gayatri Highways Share Price | गायत्री हायवेज या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गायत्री हायवेज कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर आज देखील गायत्री हायवेज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे.

गायत्री हायवेज या इन्फ्रा सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आजकाल 1 रुपयेमध्ये चॉकलेट सुद्धा मिळत नाही, मात्र भरघोस कमाई करून देणारा स्टॉक शेअर बाजारात मिळत आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गायत्री हायवेज स्टॉक 0.93 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवारी हा स्टॉक 0.97 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1.34 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 0.62 रुपये होती. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी गायत्री हायवेज स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांच्या मते, पुढील एक ते दोन वर्षांत गायत्री हायवेज कंपनीचे शेअर्स 2 रुपयेच्या पार जाऊ शकतात. सप्टेंबर 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार गायत्री हायवेज लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 61.15 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 38.85 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. गायत्री हायवेज या कंपनीच्या 5 प्रवर्तकांच्या पोर्टफोलिओमध्ये गायत्री हायवेज कंपनीचे 8,41,54,710 शेअर्स आहेत.

सप्टेंबर 2023 तिमाहीपर्यंत गायत्री हायवेज कंपनीने 0.18 कोटीची निव्वळ विक्री नोंदवली होती. हे विक्री प्रमाण मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 93.73 टक्के कमी आहे. मागील वर्षी याच तिमाहीत गायत्री हायवेज कंपनीने 2.87 कोटी रुपयेची निव्वळ विक्री नोंदवली होती.

गायत्री हायवेज कंपनीचा निव्वळ तोटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत गायत्री हायवेज कंपनीला 4.58 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर सप्टेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 1.72 कोटी रुपये होता.

सप्टेंबर 2023 तिमाहीत गायत्री हायवेज कंपनीचा EBITDA 0.70 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. गायत्री हायवेज लिमिटेड ही कंपनी पूर्वी गायत्री डोमिसाईल प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. 2018 मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड बनली. या कंपनीचे मुख्य कार्यालय हैदराबाद शहरात स्थित आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gayatri Highways Share Price NSE Live 15 January 2024.

हॅशटॅग्स

Gayatri Highways Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x