5 November 2024 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

GE Power Share Price | मल्टिबॅगर परतावा! जीई पॉवर इंडिया शेअर्सची पुन्हा खरेदी वाढली, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, खरेदी करावा का?

GE Power Share Price

GE Power Share Price | जीई पॉवर इंडिया या वीज निर्मिती आणि बांधकामात क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तब्बल 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.

या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी एक नवीन ऑर्डर मिळाल्याने पाहायला मिळत आहे. जीई पॉवर इंडिया कंपनीला ऑर्डरची बातमी मिळताच कंपनीचे शेअर्स 7.90 टक्के वाढीसह 182.90 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे बाजार भांडवल 1,200 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी जीई पॉवर इंडिया कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के वाढीसह 177.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डर तपशील

जीई पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीला 25 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या कंपनीला वेदांताच्या लांजीगड सीजीपीपी युनिटकडून ही ऑर्डर देण्यात आली आहे. या प्रोजेक्टची क्षमता 90 मेगावॉट असणार आहे. ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी 14 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. जीई पॉवर इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 198 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 97.45 रुपये होती.

कंपनीची आर्थिक कामगिरी

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत GE पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीला 135.79 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तर मागील वर्षी जून तिमाही कालावधीत कंपनीला 59.2 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. चालू आर्थिक वर्षात जीई पॉवर इंडिया कंपनीने 440.28 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 520.01 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जीई पॉवर इंडिया कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम आणि पॉवर प्लांटची सर्व्हिसिंग संबंधित व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GE Power Share Price today on 14 September 2023.

हॅशटॅग्स

GE Power Share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x