25 November 2024 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

Gensol Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने फक्त 3 वर्षांत दिला 3813% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?

Gensol Engineering Share Price

Gensol Engineering Share Price | जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 865 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजेच, या कंपनीला छत्तीसगड राज्यात 33 MW AC सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे.

जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट शारदा एनर्जी अँड मिनरल्स कंपनीने दिला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के घसरणीसह 830 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आलेला हा प्रकल्प छतीसगड राज्यातील शारदा एनर्जी कंपनीच्या खरोरा प्लांटमध्ये कॅप्टिव्ह वापरासाठी उपयुक्त ठरणार आहे. या ऑर्डर अंतर्गत जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीला डिझाइन, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम तसेच सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम देण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीला सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

अहमदाबादस्थित जेनसॉल इंजिनिअरिंग या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,200 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच QIP किंवा इतर मार्गांनी 300 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. कंपनीच्या प्रवर्तक गटाने कंपनीचे एकूण 64 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत.

या कंपनीच्या शेअरधारकांमध्ये मुकुल अग्रवाल यासारखे दिग्गज गुंतवणुकदार देखील सामील आहेत. त्यांनी कंपनीचे जवळपास 1.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीने 2021 मध्ये आपल्या शेअरधारकांना प्रत्येक तीन शेअर्सवर एक बोनस शेअर वाटप केला होता. तर मागील वर्षी कंपनीने एका शेअरवर एक बोनस शेअर्स वाटप केला होता.

शेअरने दिला मल्टिबॅगर परतावा
या शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत अनुक्रमे 945.85 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत अनुक्रमे 265.42 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचे बाजार भांडवल 3182.08 कोटी रुपये आहे. जेनसोल इंजिनीअरिंगचे शेअर्स वर्षभरात 1 टक्क्यांनी घसरले, गेल्या 1 वर्षात 141 टक्क्यांनी वाढले, गेल्या 2 वर्षांत भागधारकांना 2017 क्के परतावा दिला आणि गेल्या 3 वर्षांत 3813 टक्के परतावा दिला.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gensol Engineering Share Price NSE Live 04 January 2024.

हॅशटॅग्स

#Gensol Engineering Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x