Genus Power Share Price | असे शेअर्स मालामाल करतात, ऑर्डरबुक मजबूत, मागील 6 महिन्यांत दिला 200% परतावा, डिटेल्स नोट करा
Genus Power Share Price | जीन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 263.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जीनस पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी नवीन ऑर्डर मिळाल्याने पाहायला मिळत आहे. जीनस पॉवर कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीला 2259.94 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
या कंपनीला प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डर अंतर्गत ही कंपनी 27.33 लाख स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार आहे. आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी जीन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स स्टॉक 2.79 टक्के वाढीसह 252.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2023 या वर्षात जुलै 2023 पासून आतापर्यंत कंपनीने 6 मोठ्या ऑर्डर जिंकल्या आहेत. या सर्व ऑर्डरचे एकूण मूल्य 15160 कोटी रुपये आहे. या ऑर्डर अंतर्गत जीन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीला 172 लाख स्मार्ट प्रीपेड मीटर बसवायचे काम देण्यात आले आहे.
सध्या जीन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 19000 कोटी रुपये आहे. जीनस पॉवर कंपनीच्या पूर्ण मालकीच्या युनिटने 23 ऑक्टोबर रोजी 3121.42 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर्स जिंकली होती. 2023 या वर्षात जीन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 209 परतावा कमावून दिला आहे.
2 जानेवारी 2023 रोजी जीन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 84.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 8 नोव्हेंबर 2023 रोजी जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स 263.85 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 मे 2023 रोजी जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स 87.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 290 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 78.10 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Genus Power Share Price NSE 09 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल