18 November 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Genus Power Share Price | अल्पावधीत 575 टक्के परतावा देणारा जीनस पॉवर इन्फ्रा शेअर अप्पर सर्किटवर, ऑर्डरबुक मजबूत

Genus Power Share Price

Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, जीनस पॉवर कंपनीच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीला 1,026.31 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स स्टॉक 5 टक्के वाढीसह 234.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6041.61 कोटी रुपये आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 575 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 157 टक्के वाढली आहे. 2023 या वर्षात जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे.

26 डिसेंबर 2022 रोजी जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स 78.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 5 सप्टेंबर रोजी या कंपनीच्या शेअरने 290 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 200 टक्के वाढले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीने 49.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 6.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2023 या तिमाहीत जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीने 308 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 223 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 26.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा ऑपरेटींग नफा 16.8 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचा नफा 35 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये या कंपनीचा नफा 21.8 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 711.9 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील आर्थिक वर्षात या कंपनीचा ऑपरेशनल महसूल 826.8 कोटी रुपये संकलित झाला होता. जीनस पॉवर ही कंपनी मुख्यतः मीटरिंग आणि मीटरिंग सोल्यूशन्स आणि इंजिनीअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि टर्नकी आधारावर कॉन्ट्रॅक्टिंग सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Genus Power Share Price NSE 16 December 2023.

हॅशटॅग्स

Genus Power Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x