25 October 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 13 रुपयाचा रतन इंडिया पॉवर फोकसमध्ये, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RTNPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने कमाई होणार - NSE: ASHOKLEY GG Engineering Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 90 पैसे, स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनी नफा 1422% वाढला - Penny Stocks Jio Finance Share Price | संधी सोडू नका, जिओ फायनान्शियल शेअर देणार मोठा परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Horoscope Today | व्यवसायात बरकतीचा योग तसेच, 'या' राशींच्या पुरूषांना होईल धनलाभ, वाचा तुमचे आजचे राशीभविष्य Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
x

GG Engineering Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 90 पैसे, स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनी नफा 1422% वाढला - Penny Stocks

GG Engineering Share Price

GG Engineering Share Price | केवळ 1 रुपया 90 पैसे किंमतीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड (BOM: 540614) कंपनी शेअर खरेदीला मोठी गर्दी आहे. गुरुवारी जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी शेअर 19.50% वाढून 1.90 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 9.47 टक्के वाढून 2.08 रुपयांवर पोहोचला होता. (जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी अंश)

पेनी शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी
गुरुवारी जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी शेअरने २०% वाढ नोंदवत अप्पर सर्किटला हिट केला होता. गुरुवारी हा शेअर ₹1.67 ते ₹1.90 या रेंजमध्ये ट्रेड करत होता. बुधवारी जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी शेअर 1.59 रुपयांवर बंद झाला होता. जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचा उत्कृष्ट निकाल जाहीर केल्याने शेअरमध्ये तुफान तेजी आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या सकारात्मक आर्थिक निकालांनंतर या पेनी शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.

दुसऱ्या तिमाहीचे निकाल
जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 11 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 1 कोटीच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत आणि गेल्या जून तिमाहीत 2 कोटीच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2024 मधील 7 कोटी रुपयांच्या एकत्रित निव्वळ नफ्यापेक्षा जास्त आहे. जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2025 मध्ये 106 कोटी रुपये झाला, जो आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत 73 कोटी आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 70 कोटी रुपये हाेता. या सकारात्मक आर्थिक निकालानंतर शेअरमध्ये तुफान तेजी आहे.

शेअर्सची स्थिती
मागील एक वर्षात या शेअरने 59.66% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 29.25% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 153.33% परतावा दिला आहे.

कंपनी बद्दल
जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विविध ॲप्लिकेशन्ससाठी औद्योगिक इंजिन, डिझेल जनरेटर सेट आणि मरीन इंजिनसाठी सुटे भाग पुरवते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GG Engineering Share Price 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

GG Engineering Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x