Global Capital Markets Share Price | या शेअर्सचे गुंतवणूकदार स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्समुळे मालामाल, रेकॉर्ड डेट पूर्वी फायदा घ्या
Global Capital Markets Share Price | ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ या वित्त क्षेत्रात व्यापार करणाऱ्या NBFC कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने 20 एप्रिल 2023 हा दिवसा रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. त्याच वेळी ही कंपनी SEBI नियमांनुसार आपल्या विद्यमान शेअर धारकांना 10 : 6 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. या कंपनीचे शेअर गुरूवार दिनाक 6 एप्रिल 2023 रोजी 4.99 टक्के वाढीसह 33.01 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 82 कोटी रुपये आहे. (Global Capital Markets Limited)
कंपनीचे स्पष्टीकरण :
स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीमध्ये ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीने म्हंटले आहे की, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स वाटपासाठी 20 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. या तारखेपर्यंत नोंदणीकृत गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स दिले जातील. यासोबत कंपनीने शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या बोनस शेअर्सचे प्रमाण 10 : 6 निश्चित करण्यात आले आहे. 10 शेअर्सवर गुंतवणूकदारांना बोनस म्हणून 6 शेअर्स मिळतील.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ ही कंपनी RBI कडे नॉन बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे. कंपनी मुख्यतः स्टॉक आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून नफा कमावते. याशिवाय कंपनी कॉर्पोरेशन आणि व्यावसायिक संस्थांना अल्प आणि दीर्घ मुदतीचे कर्ज देखील.उपलब्ध करून देते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Global Capital Markets Share Price on 07 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News