17 April 2025 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार?

GMP IPO

GMP IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गो डिजिट कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी देखील गुंतवणूक केली आहे. गो डिजिट कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 258 रुपये ते 272 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. ( गो डिजिट कंपनी अंश )

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना गो डिजिट कंपनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून 263 टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने गो डिजिट कंपनीमध्ये अडीच कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. जर हा स्टॉक शेअर बाजारात अप्पर किंमत बँडवर म्हणजेच 272 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला तर विराटच्या गुंतवणुकीचे मूल्य लिस्टिंगच्या दिवशी 9.06 कोटी रुपये होईल. त्याचवेळी अनुष्का शर्माने गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये 50 लाख रुपये गुंतवणूक केली होती. हे दोघेही आयपीओद्वारे आपली हिस्सेदारी घटवणार नाही, अशी बातमी मिळत आहे.

गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीचा IPO 15 मे 2024 ते 17 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 55 शेअर्स ठेवले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 14,960 रुपये जमा करावे लागतील. या कंपनीचे शेअर्स 21 मे रोजी वाटप केले जातील. आणि 23 मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.

गो डिजिट कंपनीचे प्रवर्तक गो डिजिट इन्फोवर्क्स आणि इतर भागधारक आयपीओद्वारे त्यांचे भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहेत. गो डिजिट कंपनीमध्ये एफएमएल कॉर्पोरेशन कंपनीने 45.30 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्याच वेळी, कामेश गोयल आणि ओबेन व्हेंचर्स एलएलपी यांनी कंपनीचे अनुक्रमे 14.96 टक्के आणि 39.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

ग्रे मार्केटमध्ये गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ स्टॉक 50 रुपये प्रीमियमवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक किंमत बँड आणि ग्रे मार्केट किमतीच्या आधारे 322 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांना गो डिजिट IPO मधून 18.38 टक्के नफा मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GMP IPO of Go Digit Ltd 11 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GMP IPO(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या