19 April 2025 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP

GMP IPO

GMP IPO | लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 200 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात एसएमई विभागातील दोन आयपीओ लाँच होणार आहेत. मागील वर्षभरात अनेक IPO गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहेत.

इतके शेअर्स विक्रीला

लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि 26 नोव्हेंबर पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ शेअर एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर 29 नोव्हेंबरला सूचिबद्ध केले जाऊ शकतात. लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 30.6 लाख शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहे. हे पूर्णपणे फ्रेश शेअर्स असतील. म्हणजेच आयपीओ मार्फत मिळणारी संपूर्ण रक्कम लॅमोसेक इंडिया कंपनीच्या खात्यात जाईल. लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनी या आयपीओ मार्फत 61.2 कोटी रुपये उभारणार आहे असे कंपनीने म्हटले आहे.

लॉट आकार

लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी किमान लॉट आकार 600 शेअर्स आहे. लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान 1,20,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या आयपीओ मध्ये एचएनआयसाठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (1,200 शेअर्स) आहे, जी 2,40,000 रुपये आहे. सध्या ग्रे मार्केट मधून अपडेट येणं बाकी आहे

आयपीओ निधीचा वापर

लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ मार्फत मिळालेला निधीचा वापर काही कर्जाची परतफेड करण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अजैविक वाढीच्या संधी शोधण्यासाठी आणि इतर सामान्य कॉर्पोरेट खर्चासाठी करणार आहे अशी माहिती दिली आहे.

कंपनीची उत्पादने

मुंबई मुख्यालय असलेली लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनी फ्लश डोअर्स, ॲक्रेलिक शीट्स, डेकोरेटिव्ह लॅमिनेट, प्रिंटिंग पेपर (बेस) आणि प्लायवुड यांसारख्या उत्पादनांमध्ये व्यवहार करते. लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत उत्पादन सुरू केले. लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनी कंपनी आपली उत्पादने B2B ग्राहकांना लॅमोसेक या ब्रँड नावाने विकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GMP IPO of Lamosek India Ltd 15 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GMP IPO(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या