12 December 2024 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

GMP IPO | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागून 109% परतावा मिळेल, संधी सोडू नका - IPO GMP

GMP IPO

GMP IPO | टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ’मध्ये १० डिसेंबरपासून गुंतवणुक करता येणार आहे. टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी १२ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी या आयपीओद्वारे ९.१७ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. हा आयपीओ शेअर बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात येणार आहे.

1) टॉस द कॉइन आयपीओ ९.१७ कोटी रुपयांचा

टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ मार्फत ९.१७ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ ५.०४ लाख शेअर्सचा पूर्णपणे नवा इश्यू आहे. नारायणन जयन, रेश्मा बुधिया आणि सुधांशु बुधिया हे टॉस द कॉइन लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आहेत.

2) आयपीओ शेअर प्राइस बँड

टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 172-182 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केली आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 600 शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १,०९,२०० रुपये गुंतवावे लागणार आहेत.

3) आयपीओ जीएमपी

अनलिस्टेड मार्केटमध्ये टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरचा जीएमपी २०० रुपयांवर आहे, जो आयपीओ प्राईस बँड पेक्षा १०९.८ टक्क्याने जास्त आहे.

4) कंपनी बद्दल

टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी एक विपणन सल्लागार कंपनी आहे ही कंपनी ग्राहकांना सानुकूल-निर्मित विपणन सेवा प्रदान करते. कंपनी बी2बी टेक कंपन्यांसाठी विपणन सल्ला सेवा पुरवते. टॉस द कॉइन लिमिटेड कंपनीला अनेक लहान-मोठ्या तंत्रज्ञान संस्थांसोबत काम करण्याचा अनुभव आहे.

5) टॉस द कॉइन लिमिटेडची आर्थिक कामगिरी

31 मार्च 2024 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षात टॉस द कॉइन लिमिटेडच्या महसुलात 2.49% आणि करोत्तर नफ्यात (पीएटी) 38.39% घट झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 4.38 कोटी रुपये आणि करोत्तर नफा 1.16 कोटी रुपये होता.

6) आयपीओचा उद्देश

टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी या आयपीओ’मार्फत मिळणाऱ्या निधीचा वापर मायक्रोसर्व्हिसेस ऍप्लिकेशनच्या विकासासाठी, नवीन कंपनी कार्यालये उघडण्यासाठी, कंपनीच्या वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूं करणार आहे.

७) इश्यू स्ट्रक्चर

टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ पैकी 50% हिस्सा क्यूआयबी गुंतवणूकदारांसाठी, 35 % रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि 15% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GMP IPO of Toss The Coin Ltd Saturday 07 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GMP IPO(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x