11 January 2025 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा
x

GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP

GMP IPO

GMP IPO | स्टॉक मार्केट आयपीओ मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायद्याची अपडेट आहे. यश हाय व्होल्टेजचा आयपीओ १२ डिसेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. हो, यश हाय व्होल्टेज लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुरुवार, 12 डिसेंबर 2024 रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. सोमवार, 16 डिसेंबर पर्यंत या आयपीओसाठी गुंतवणूक करता येणार आहे.

यश हाय व्होल्टेज आयपीओ प्राइस बँड

यश हाय व्होल्टेज लिमिटेड कंपनी आयपीओसाठी १३८ ते १४६ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. यश हाय व्होल्टेज आयपीओसाठी कमीत कमी १,००० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १,००० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.

यश हाय व्होल्टेज आयपीओ शेअर GMP

इन्व्हेस्टगेन डॉटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, ‘यश हाय व्होल्टेज लिमिटेड कंपनी आयपीओ अनलिस्टेड म्हणजे शेअर ग्रे मार्केटमध्ये 130 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. यश हाय व्होल्टेज आयपीओ शेअरचा अप्पर बँड आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम विचारात घेता यश हाय व्होल्टेज आयपीओ शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत 276 रुपये प्रति शेअर असू शकते. ही यश हाय व्होल्टेज आयपीओ किंमत १४६ रुपयांपेक्षा जवळपास ९० टक्क्याने अधिक आहे.

आयपीओ तपशील काय आहेत?

यश हाय व्होल्टेज लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 64,05,000 इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि शेअरहोल्डिंग विकणाऱ्या कंपनी प्रवर्तकांकडून 11,30,000 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. यश हाय व्होल्टेज लिमिटेड कंपनी आयपीओ मार्फत मिळणाऱ्या निधीचा वापर रेझिन इम्प्रेग्नेटेड पेपर आणि रेझिन सिंथेटिक ट्रान्सफॉर्मर कंडेन्सर ग्रेडेड बुशिंगच्या निर्मितीसाठी, तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी आणि नवीन कारखाना उभारण्यासाठी करणार असल्याचे नमूद केले आहे.

यश हायव्होल्टेज आयपीओसाठी इंडोरेंट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून जबरदारी सांभाळणार आहेत, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहेत.

कंपनी व्यवसाय

यश हाय व्होल्टेज लिमिटेड कंपनी ट्रान्सफॉर्मर बुशिंग्सची विस्तृत श्रेणी तयार आणि वितरित करण्याच्या व्यवसायात सक्रिय आहे. यामध्ये ऑइल प्रेग्नेटेड पेपर कंडेन्सर बुशिंग, रेझिन प्रेग्नेटेड पेपर आणि राळ सिंथेटिक कंडेन्सर बुशिंग, हाय व्होल्टेज आणि हाय करंट बुशिंग, वॉल बुशिंग आणि ओआयपी यांचा प्रॉडक्टचा समावेश आहे. यश हाय व्होल्टेज लिमिटेड कंपनी विस्तृत श्रेणीट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, रिप्लेसमेंट आणि रेट्रोफिटिंग सेवा देखील प्रदान करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GMP IPO of Yash Highvoltage Ltd Wednesday 11 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GMP IPO(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x