21 January 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका
x

GMR Infra Share Price | 1 महिन्यात 28% परतावा देणारा GMR एअरपोर्ट्स इन्फ्रा शेअर देईल मोठा परतावा, कारण काय?

GMR Infra Share Price

GMR Infra Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत होते. हा कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 77.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने NIIF म्हणजेच राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी यांनी GMR विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीमध्ये 675 कोटी रुपये मूल्याच्या गुंतवणुकीसाठी करार संपन्न केला आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1 टक्के घसरणीसह 73.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

GMR विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला 2020 मध्ये 40 वर्षांच्या मुदतीसाठी विशाखापट्टणमच्या उत्तरेकडील ग्रीनफिल्ड भोगापुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित आणि ऑपरेट करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. ग्रीनफील्ड भोगापुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ आंध्र प्रदेश राज्यातील सर्वात मोठे विमानतळ असेल. या विमानतळाची पहिल्या टप्प्यात प्रतिवर्षी क्षमता 6 दशलक्ष प्रवासी असेल.

जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये GMR एअरपोर्ट कंपनीच्या तीन विमानतळ प्रकल्पांच्या भागभांडवलात NIIF द्वारे गुंतवणुक करण्या संदर्भात करार केला होता. GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी गुंतवणुकीनंतर NIIF ची दुसरी एअरपोर्ट गुंतवणूक असलेली कंपनी बनली आहे.

19 डिसेंबर 2023 रोजी जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 79.47 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 36 रुपये होती. मागील एका महिन्यात जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 टक्के मजबूत झाली आहे. तर 2023 मध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 80 टक्क्यांनी वाढली आहे.

जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे शेअर्स ASM च्या स्टेज 1 श्रेणीमध्ये ठेवल्यात आले होते. ASM ही एक स्टॉक एक्स्चेंजची निरीक्षण यंत्रणा आहे, ज्याद्वारे सेबी गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या निरीक्षणाखाली ठेवते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GMR Infra Share Price NSE Live 26 December 2023.

हॅशटॅग्स

GMR Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x