GMR Power Share Price | नो अदानी पॉवर, नो टाटा पॉवर! जीएमआर पॉवर शेअर अल्पावधीत देतोय मल्टिबॅगर परतावा, फायद्यात राहा
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, जीएमआर ग्रुपला नवीन ऑर्डर मिळाली आहे.
या कंपनीने 3 सप्टेंबर 2023 रोजी स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीला पूर्वांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड कंपनीकडून 5123 कोटी रुपये मूल्याची स्मार्ट मीटरिंग प्रकल्पाची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 9.97 टक्के वाढीसह 37.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 34.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,066.71 कोटी रुपये आहे. GMR स्मार्ट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जीएमआर पॉवरची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीला पूर्वांचलमधील वाराणसी, आझमगढ झोन आणि प्रयागराज मिर्झापूर झोनमध्ये स्मार्ट मीटरिंग प्रकल्पासाठी ऑर्डर देण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत जीएमआर पॉवर कंपनीला 50.17 लाख स्मार्ट मीटर बसवण्याचे आणि देखभाल करण्याचे काम देण्यात आले आहे. जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीला हा प्रकल्प 27 महिन्यांत पूर्ण करायचा आहे. आणि देखभालीचा कालावधी 93 महिने निश्चित करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश प्रयागराज आणि मिर्झापूर झोनमधील या संपूर्ण मीटर बसवण्याच्या प्रकल्पांचे मूल्य 2,386.72 कोटी रुपये आहे. वाराणसी आणि आझमगड झोनमध्ये मीटर बसवण्याच्या कामाचे मूल्य 2,736.65 कोटी रुपये आहे. आग्रा आणि अलीगढ़ झोनमध्ये म्हणजेच उत्तर राज्यातील दक्षिणांचल भागात 25.52 लाख स्मार्ट मीटर बसवण्याचे काम दक्षिणांचल विद्युत वितरण निगम कंपनीजीकडून मिळण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. 2023 या वर्षात जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स दुप्पट वाढले आहेत.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 114 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.32 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आणि अवघ्या चार महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 139 टक्के वाढीसह 34.24 रुपये किंमत स्पर्श केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | GMR Power Share Price today on 05 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH