
Godha Cabcon Share Price | गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह 0.95 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आ देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन कंपनीने नुकताच ओव्हरसीज मेटल अँड अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली असल्याची बातमी जाहीर केली, आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे.
Godha Share Price
गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन कंपनीला नुकताच 566 दशलक्ष रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन कंपनीचे शेअर्स 5.26 टक्के वाढीसह 1.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ऑर्डर तपशील : गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन कंपनीला मिळालेल्या ऑर्डरमध्ये 4 कोर एचटी पॉवर केबल आणि अॅल्युमिनियम ACSR वीसेल कंडक्टर पुरवण्याचे काम देण्यात आले आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 0.95 पैसे किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4.34 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 0.80 पैसे होती.
गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन लिमिटेड कंपनी मुख्यतः अॅल्युमिनियम कंडक्टर बनवण्याचे काम करते. हे ओव्हरहेड पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युटर लाईन्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. कंपनीचे मुख्य उत्पादन युनिट मध्य प्रदेश राज्यात इंदोर या ठिकाणी स्थित आहे.
गोधा कॅबकॉन अँड इन्सुलेशन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 60 कोटी आहे. या कंपनीवर सध्या खूप कमी कर्ज आहे. आणि कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. सध्या कंपनीवर फक्त 2.5 कोटी रुपये आहे, जे एकूण बाजार भांडवलाच्या फक्त 4.17 टक्के आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.




























