18 April 2025 4:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Godrej Consumer Products Share Price | या कंपनीच्या शेअरने इतका परतावा दिला की अक्षरशः गुंतवणुकदार करोडपती झाले

Godrej Consumer Products Share Price

Godrej Consumer Products Share Price | ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ या गोदरेज ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना झटपट करोडपती बनवले आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीजवळ पोहोचले आहेत. प्रॉफिट बुकींगमुळे शेअर मध्ये किंचित पडझड झाली मात्र तरीही शेअर बाजारातील तज्ञ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 968.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 12 टक्क्यांनी वाढू शकतो. (Godrej Consumer Products Limited)

आर्थिक वर्ष 2020 ते 2023 दरम्यान ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीचा व्यवसाय दुहेरी अंकांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2017 ते आर्थिक वर्ष 2022 दरम्यान ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीचा ROCE म्हणजेच रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 52 टक्क्यांवरून वाढून 57 टक्क्यांवर गेला आहे. ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनी देशांतर्गत बाजारपेठांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करते कारण इथे विदेशी बाजारांच्या तुलनेत मार्जिन दुप्पट आहे. अशा परिस्थितीत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरसाठी 1080 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

शेअर्स चार्ट पॅटर्नवर ही मजबूत
‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर ही मजबूत दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते स्टॉकने चार्टवर कप आणि हँडल पँटर्न तयार केला केला असून तो 968.05 रुपयेच्या वर ट्रेड करत आहे. तज्ञांनी स्टॉकवर 1060-1080 रुपये लक्ष्य किंमत देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 940 रुपये किंमत पातळीवर स्टॉकला मजबूत सपोर्ट आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे 235 पट वाढवले
गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 235 पट वाढवले आहेत. ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 22 जून 2001 रोजी 4.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये 23404 टक्क्यांची वाढ झाली असून शेअरची किंमत आता 968.05 रुपयांवर पोहोचली आहे. इंट्रा डे सेशनदरम्यान स्टॉक 972.65 रुपयांवर पोहचला होता. मागील 22 वर्षापूर्वी ज्या लोकांनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 2.35 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. या स्टॉकने केवळ दीर्घ मुदतीतच नव्हे तर, अल्पावधीत ही उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. 30 मार्च 2022 रोजी हा स्टॉक 699.75 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षात स्टॉक 39 टक्क्यांनी वाढला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Godrej Consumer Products Share Price on 01 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Godrej Consumer Products Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या