8 November 2024 8:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

Gokaldas Exports Share Price | होय! फक्त 28 रुपयाच्या शेअरने 3 वर्षात 17 पट परतावा दिला, असा मल्टिबॅगर शेअर खरेदी करणार का?

Gokaldas Exports Share Price

Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्स्पोर्ट्स या कपड्यांची निर्यात करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स कोरोना लॉक डाऊनमध्ये अगदी तळावर पोहचले होते. त्यानंतर हा स्टॉक इतक्या वेगात वाढला की, गुंतवणुकदरांनी अवघ्या तीन वर्षांत 1660 टक्के नफा कमावला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल-जून तिमाहीत कमजोर कामगिरीचा परिणाम शेअरवर पाहायला मिळत आहे.

मात्र अनेक ब्रोकरेज फर्म या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. यासह तज्ञांनी स्टॉकच्या लक्ष्य किंमतीमध्ये वाढ देखील केली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास हा स्टॉक अल्पावधीत 20 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.81 टक्क्यांच्या घसरणीसह 496.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.14 टक्के वाढीसह 505.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

27 मे 2020 रोजी गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 28.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर संथ गतीने वाढ पाहायला मिळत आहे. अन् हा स्टॉक 505 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17 पट अधिक परतावा कमावून दिला आहे.

19 सप्टेंबर 2022 रोजी गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 325.70 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. अवघ्या 10 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 71 टक्क्यांच्या वाढीसह18 जुलै 2023 रोजी 558.05 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक पातळीवर पोहचले होते. आता मात्र हा स्टॉक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी खाली आला आहे.

जून 2023 तिमाहीत गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या EBITDA मध्ये 17 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. आणि कंपनीचा EBITDA 60.2 कोटी रुपयेवर आला आहे. कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 16 टक्क्यांच्या घसरणीसह 500 कोटी रुपयेवर पोहचला आहे. यूएस स्टॉक मार्केटमधील मंदी आणि इन्व्हेंटरी लिक्विडेशनमुळे कंपनीच्या महसुलावर किंचित परिणाम पाहायला मिळाला आहे.

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीने महसुलात वाढ होऊन देखील आपल्या खर्चावर कडक नियंत्रण लादले आहे. परिणामी कंपनीचा एकूण मार्जिन 50 टक्के आणि EBITDA मार्जिन 12 टक्केवर पोहचला आहे. आणि ऑपरेटिंग लिव्हरेज फायदा कंपनीला पुढील तिमाहीत मिळण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2024-25 मधील EBITDA अंदाज 2-3 टक्क्यांनी वाढवला आहे. तज्ञांनी गोकलदास एक्सपोर्ट्स स्टॉकवर 595 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gokaldas Exports Share Price today on 10 August 2023.

हॅशटॅग्स

#Gokaldas Exports Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x