16 April 2025 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Gold Price | सोने १,६२१ रुपयांनी घसरले | ही आहेत घसरणीची ४ मोठी कारणे

Gold price falls

मुंबई, १८ सप्टेंबर | सणासुदीत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी २४ कॅरेट सोने १,१३० रु. स्वस्त होऊन ४५,२०७ रु. प्रति १० ग्रॅमवर आले. गुरुवारीही दिल्लीत सोने ४९१ रु. स्वस्त झाले होते. याच पद्धतीने दोन दिवसांत सोने १,६२१ रु. स्वस्त झाले. किमती घटल्याने दागिन्यांच्या किमती वाढतील, कारण सणात सोने खरेदी शुभ मानली जाते.

Gold Price, सोने १,६२१ रुपयांनी घसरले, ही आहेत घसरणीची ४ मोठी कारणे – Gold price falls by rupees 1621 these are the reasons for fall in gold price :

वास्तवात सोन्याला डॉलर बळकट होण्याचे परिणाम सोसावे लागत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणाले, अमेरिकेत रिटेल विक्रीच्या जोरदार आकड्यामुळे डॉलरला सपोर्ट मिळण्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर (Fall in gold price) दिसू शकतो.

५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोने ४५,२५९ रु. व २२ कॅरेट सोने ४१,४५७ रु. प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होते. दागिन्यांचे सोने ४२,५०० पेक्षा खाली केवळ दिल्लीत स्वस्त झाले नाही तर पूर्ण देशाच्या सराफा बाजारात घसरणीचा कल दिसू शकतो. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार(आयबीजेए) शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,३१० रु. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ४२,४२० रु. होती. गेल्या दोन दिवसांत शुद्ध सोन्याची किंमत ९४५ रु. आणि दागिन्यांच्या सोन्याची किंमत ८६६ रु. घटली आहे.

सोन्यातील घसरणीची चार मोठी कारणे :
१ . मोठ्या देशांच्या केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी बंद केली. यामुळे पुरवठा अचानक वाढला आहे.
२. अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर परतल्याने डॉलरला बळ मिळाले आणि सोन्यावर दबाव वाढू लागला.
३. कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता घटल्याने हेजिंगसाठी सोन्याची मागणी कमकुवत झाली.
४. जगभरातील शेअर बाजारांत सलग तेजीचा कल राहिल्याने गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी घटली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Gold price falls by rupees 1621 these are the reasons for fall in gold price.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GoldPrice(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या