20 April 2025 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Gold Rate | सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी | जाणून घ्या आजचे सोन्याचे नवे दर

Gold Rate

मुंबई, ०७ ऑक्टोबर | मुंबईत शहरात 300 वर्षापेक्षा अधिक सोन्याची जुनी (Gold Rate) दुकाने आहेत. सोने आणि सोन्याचा व्यापार मुंबईत मोठ्याप्रमाणावर होती. त्यामुळे सोन्याच्या दरात होणारे चढ -उतार मुंबईत मोठा परिमाण करून जातात. मुंबईकर सोन्याच्या पट्ट्या, नाणी, दागदागिने, इनगॉट्स, एक्सचेंजेस इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. मुंबईत आज सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी 46,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटसाठी 45,680 रुपये आहे.

Gold Rate. Gold Rate updates on 7 October 2021 in India. Gold rate in Mumbai today is ₹ 46,680 per 10 grams for 24 Carat and ₹ 45,680 for 22 Carat :

भारतीयांना सोन्याचे जबरदस्त आकर्षण असले तरी घरात असलेल्या सोन्याचा हिशेब व ते खरेदी करण्यासाठी वापरलेल्या पैशाचा स्रोत कायदेशीर असणे आवश्यक आहे. तुमच्या घरातील सोन्याच्या खरेदीसाठी लागलेला पैसा कुठून आणला, हे तुम्हाला सांगता आले नाही, तर तुमचे सोने जप्त होऊ शकते.

सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अनेक जण सोने खरेदीला प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत सोन्याचे दरही गगनाला भिडल्याने या सोन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम केले आहेत.

या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. वास्तविक घरात सोने साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. कायदेशीर मार्गाने खरेदी केलेले कितीही सोने नागरिक आपल्या घरात ठेवू शकतात. फक्त त्याचे पुरावे खरेदीदाराकडे असायला हवेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीडीटी) माहितीनुसार, नागरिक आपल्या घरात सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकतात. मात्र, प्राप्तिकर विभागाकडून घरातील किंवा बँकेच्या लॉकरमधील सोन्याची तपासणी होऊ शकते. अशा तपासणीच्या वेळी सोन्याचा स्रोत तुम्हाला पुराव्यांसह सांगता आला पाहिजे

प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार, तुमच्या घरात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने असतील तर प्राप्तिकर विवरणपत्रात (इन्कम टॅक्स रिटर्न) ते नमूद करणे बंधनकारक आहे. लग्न झालेल्या स्त्रीला घरात ५०० ग्रॅम दागिने ठेवण्याची मुभा आहे. अविवाहित स्त्री घरात २५० ग्रॅम दागिने ठेवू शकते.

पुरुषांना घरात १०० ग्रॅम सोने बाळगण्याची मुभा आहे. या सोन्याच्या विक्रीवर भांडवली कर भरावा लागतो. काय सांगतो प्राप्तिकर कायदा? प्राप्तिकर अधिनियम १९६१ च्या कलम १३२ नुसार तपासादरम्यान एखादी व्यक्ती आपल्याकडील मौल्यवान वस्तू किंवा दागिने यासंदर्भात योग्य माहिती देऊ शकली नाही, अथवा उत्पन्नाचे योग्य स्रोत दाखवू शकला नाही, तर त्या वस्तू प्राप्तिकर अधिकारी जप्त करू शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Gold Rate updates on 7 October 2021 in India

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GoldPrice(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या