22 February 2025 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Government Investment Schemes | सर्वोत्तम सरकारी बचत योजना, तुम्ही तुमचा पैसा या योजनांमध्ये वेगाने वाढवू शकता

Government Investment Schsmes

Government Investment Schemes | सरकार आणि सरकारी वित्तीय संस्थांकडून गुंतवणूकदारांना अनेक गुंतवणुकीचे पर्याय दिले जातात. यातून मुलांचे शिक्षण, लग्न, निवृत्ती अशी अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. अनेक सरकारी गुंतवणूक योजना दीर्घकाळात जबरदस्त परतावा मिळवून देतात. कारण त्यांच्यावर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही.

सर्वोत्कृष्ट सरकारी बचत योजना :
तुम्ही तुमचे कष्टाने कमावलेले पैसे गुंतवण्यासाठी पर्याय शोधत असता. सरकार आणि सरकारी वित्तीय संस्थांनी तुमच्या सारख्या गुंतवणूकदारांसाठी अनेक गुंतवणुक योजना सुरू केल्या आहेत. यातून तुम्ही मुलांचे शिक्षण, लग्न, सेवानिवृत्ती अशी अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करू शकता. गुंतवणूकदार त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार उपलब्ध बचत पर्यायांमधून चांगल्या योजनांची निवड करू शकतात. गुंतवणुकदारांना आवडलेल्या प्रमुख सरकारी गुंतवणूक योजनांमध्ये PPF, NSC, पोस्ट ऑफिस बचत खाते, KVP यापैकी बहुतांश सरकारी बचत योजना विश्वसनीय, कमी जोखीमच्या आणि सुरक्षित आहेत.

तज्ञांच्या मते, यापैकी काही योजनामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली तर मोठ्या भांडवलाची निर्मिती करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. कारण त्यांच्यावर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम होत नाही. यापैकी काही बचत योजनांचे मिळणारा परतावा व्याज त्रैमासिक किंवा सहामाहीनुसार खर्च आणि चलनवाढीच्या आधारावर निश्चित केले जातात. तर चला मग ह्या लेखात जाणून घेऊ सर्व सरकारी योजनांबद्दल

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
भारत सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेत तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये गुंतवून या योजनेचा लाभ घेऊ शकता. एका वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पीपीएफमधील गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज परतावा मिळतो. 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सवलातीचाही लाभ मिळेल.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :
NSC या योजने अंतर्गत तुम्ही किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. या गुंतवणुकीवर तुम्हाला चक्रवाढ व्याज पद्धतीने वार्षिक 6.8 टक्के परतावा मिळेल. 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर तुम्हाला कर सवलत ही मिळेल.

पोस्ट ऑफिस बचत खाते :
कोणतीही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन बचत खाते खोलु शकतो. यामध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. या बचत खात्यात गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. वार्षिक 4 टक्के दराने यावर व्याज परतावाही दिला जातो. या बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर मिळणारे व्याज करमुक्त असते.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना :
या योजने अंतर्गत, तुम्ही किमान 100 रुपयेंपासून गुंतवणूक सुरू करू शकता,यात कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. गुंतवलेल्या रकमेवर पहिल्या तीन वर्षांसाठी 5.5 टक्के दराने आणि पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी 6.7 टक्के दराने व्याज परतावा मिळते. आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत, या योजनेतील ठेवींवर 5 वर्षांसाठी कर सवलतीचा लाभ उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना :
या योजने अंतर्गत, तुम्ही किमान 100 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता, यात कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. तुम्ही एकट्याच्या नावाने खाते उघडून किंवा संयुक्तपणे खाते उघडून यात गुंतवणूक करू शकता. या योजनेतील गुंतवणुकीवर 5.8 टक्के दराने व्याज परतावा मिळते. मिळणारा व्याज परतावा कर मुक्त असतो आणि ठेवींवर कोणतीही वजावट होत नाही.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना :
या योजनेअंतर्गत, एका खात्यात किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवणूक करता येतात. गुंतवणुकीवर वार्षिक 6.6 टक्के दराने व्याज परतावा मिळते. व्याज परतावा कर मुक्त असून ठेवींवर देखील कोणतीही वजावट होत नाही.

किसान विकास पत्र :
या योजने अंतर्गत, तुम्ही किमान 1 हजार रुपये जमा करून गुंतवणूक सुरु करू शकता. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. गुंतवणुकीवर मिळणारा परतावा चक्रवाढ व्याज पद्धतीने वार्षिक 6.9 टक्के या दराने दिला जातो. व्याज आणि मुदतपूर्तीवर मिळालेली रक्कम करमुक्त असते. या योजनेचे खास वैशष्ट्ये म्हणजे तुमची गुंतवलेली रक्कम 124 महिन्यांत दुप्पट होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Government Investment Schemes returns on investment and benefits on 5 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Government investment schemes(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x