15 January 2025 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

Goyal Salt IPO | सुवर्ण संधी! होय! फक्त 36 रुपयाचा गोयल सॉल्ट IPO शेअर पहिल्याच दिवशी 53 टक्के परतावा देईल, GMP पहा

Goyal Salt IPO

Goyal Salt IPO | गोयल सॉल्ट या कच्चे मीठ शुद्ध करणाऱ्या कंपनीचा IPO नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. गोयल सॉल्ट कंपनीचा IPO आतापर्यंत 115 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या तुम्ही कंपनीच्या IPO मध्ये 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता.

गोयल सॉल्ट कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये देखील तुफानी कामगिरी करत आहेत. ग्रे मार्केटमध्ये गोयल सॉल्ट कंपनीचे शेअर्स 53 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 36-38 रुपये निश्चित केली आहे. सध्या या कंपनीच्या शेअरची 20 रुपये किमतीवर पोहचली आहे.

जर गोयल सॉल्ट कंपनीचे IPO शेअर्सचे 38 रुपये या अप्पर प्राइस बँडवर वाटप केले गेले, आणि शेअर 22 रुपये ग्रे मार्केट प्रीमियमवर टिकुन राहिला, तर या कंपनीचे शेअर्स 58 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच ज्या गुंतवणुकदारांना गोयल सॉल्ट IPO चे शेअर्स मिळतील त्यांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 50 टक्क्यांपेक्षा अधिक जास्त नफा मिळू शकतो. गोयल सॉल्ट या कंपनीचा IPO एकूण 114.87 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.

गोयल सॉल्ट कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 184.47 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. आणि गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 85.80 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 9.62 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.

या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 18.63 कोटी रुपये आहे. किरकोळ गुंतवणूकदार गोयल सॉल्ट कंपनीच्या IPO मध्ये किमान 1 लॉट खरेदी करू शकत होते. गोयल सॉल्ट कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 3000 शेअर्स ठेवले होते. आणि किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 114,000 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Goyal Salt IPO 02 October 2023.

हॅशटॅग्स

Goyal Salt IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x