6 November 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Goyal Salt Share Price | कुबेर कृपा होतेय! अवघ्या एका महिन्यात 363 टक्के परतावा दिला या शेअरने, वेळीच एंट्री घ्या

Goyal Salt Share Price

Goyal Salt Share Price | गोयल सॉल्ट कंपनीचा IPO स्टॉक नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. गोयल सॉल्ट कंपनीचा आयपीओ जेव्हा शेअर बाजारात आला तेव्हा त्याची किंमत 38 रुपये प्रति शेअर होती. तर आता या कंपनीचे शेअर्स 180 रुपये किमतीच्या पार गेले आहे.

आयपीओ किमतीच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स 363 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील दिवसापासून या कंपनीचा स्टॉक दररोज अप्पर सर्किट तोडत आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी गोयल सॉल्ट कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 184.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गोयल सॉल्ट कंपनीचा IPO शेअर बाजारात NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगनंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळाली होती. आता गोयल सॉल्ट कंपनीच्या शेअरने चांगली गती पकडली आहे. 13 ऑक्टोबर 2023 पासून या कंपनीचे शेअर्स दररोज अपर सर्किट हीट करत आहेत.

गोयल सॉल्ट कंपनीचे शेअर्स 11 ऑक्टोबर 2023 रोजी 242 टक्के प्रीमियम वाढीसह 130 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. गोयल सॉल्ट कंपनीचा IPO मागील महिन्यात 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

हा IPO ओपन झाल्यावर अवघ्या 5 दिवसात 511 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 3000 शेअर्स ठेवले होते. यासाठी गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,14,000 रुपये जमा करावे लागले होते. ज्या गुंतवणूकदारांना गोयल सॉल्ट कंपनीचे शेअर्स वाटप करण्यात आले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य आता 5.27 लाख रुपयेवर पोहचले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Goyal Salt Share Price NSE 23 October 2023.

हॅशटॅग्स

Goyal Salt Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x