21 April 2025 4:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

GPT Infra Share Price | 1 वर्षभरात दिला 300% परतावा, ऑर्डर बुक मजबूत झाली, स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग

GPT Infra Share Price

GPT Infra Share Price | जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. मंगळवारी शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स स्टॉक 4.9 टक्के वाढीसह 239 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला रेल विकास निगम कंपनीकडून 547 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 251.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला एलिव्हेटेड कॉरिडॉर, रोड ओव्हर ब्रिज आणि एक्झिट-एंट्री रॅम्पचा व्हायाडक्ट भाग बांधण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय NHAI कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि विद्युतीकरण आणि प्रकाशयोजनेसह इतर विविध कामांची ऑर्डर जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला मिळाली आहे. ही कंपनी पश्चिम बंगालमध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम मोडवर सहापदरी एलिव्हेटेड एक्सप्रेसवेच्या सात किलोमीटरच्या पट्ट्याचे काम करणार आहे.

जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3,646 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीला 674 कोटीची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 265 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 55.72 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,297.24 कोटी रुपये आहे.

जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स ही कंपनी मुख्यतः रेल्वे संबंधित पायाभूत सेवा सुविधा प्रदान करणारी कंपनी आहे. ही नागरी आणि पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा व्यवसाय करते. जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स ही कंपनी विशेषतः मोठे पूल आणि ROB रेल्वे, रस्ते, यांच्या विकासाचे काम करते. मागील एका वर्षभरात जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 300 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GPT Infra Share Price NSE Live 06 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

GPT Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या