23 December 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Stock in Focus | कमालीच्या तेजीमुळे फोकसमध्ये आला हा स्टॉक, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, फायद्याच्या स्टॉकबद्दल जाणून घ्या

Stock In focus

Stock in Focus | Greencrest Financial Services या कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने स्टॉक स्प्लिट करून शेअर्स वाटप करण्याची तारीखही जाहीर केली आहे. Greencrest Financial Services च्या स्टॉकने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच स्टॉक स्प्लिट चा प्रस्ताव पारित केला आहे. चला तर मग जाणून घेऊ हा कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचे सविस्तर तपशील

10:1 स्टॉक स्प्लिट गुणोत्तर :
Greencrest Financial Services ने आपले शेअर्स10:1 विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ही कंपनी आपला एक शेअर 10 अतिरिक्त शेअर्स मध्ये विभाजित करेल. या विभाजन प्रक्रियेनंतर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरची दर्शनी किंमत 1 रुपये होईल. Greencrest Financial Services ने आपल्या शेअर्सचे विभाजन करण्यासाठी 12 ऑक्टोबर 2022 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे.

शेअर्स ची वाटचाल :
Greencrest Financial Services कंपनीचे शेअर्स दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने 5 टक्केचा अपर सर्किट लागत आहे. या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी काळात अप्रतिम नफा कमावून दिला आहे. शेअरची किंमत सतत वाढत आहे, आणि आता स्टॉक स्प्लिट ची घोषणा स्टॉक मध्ये सकारात्मक वाढ करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. Greencrest Financial Services कंपनीचे स्टॉक 7 पैकी 6 ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. 2022 मध्ये आतापर्यंत ह्या शेअर्स मध्ये 150 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

स्टॉकची ट्रेडिंग किंमत :
Greencrest Financial Services चे शेअर्स 2022 च्या सुरुवातीला 6.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात भरघोस वाढ होऊन शेअर्स आता 17.17 रुपये किमतीवर गेले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 233.40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळालं आहे. हा शेअर सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमतीवर ट्रेड करत आहे. ह्या शेअर मधील स्थिर वाढीने गुंतवणूकदारांचे आणि शेअर मार्केट तज्ञांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. ह्या प्रकारची तेजी शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना येणाऱ्या काळात जबरदस्त परतावा कमावून देऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Greencrest Financial Services Stock in focus of Investors check details on 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x