18 October 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

GRM Overseas Share Price | मार्ग श्रीमंतीचा! कुबेर कृपा असणारा शेअर तेजीत, 5 दिवसात 20% परतावा, यापूर्वी 6700% परतावा दिला

GRM Overseas Share Price

GRM Overseas Share Price | GRM ओव्हरसीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी 17 टक्के वाढीसह 179 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरूवारी GRM ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 7.48 टक्के वाढीसह 226 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे.

सकाळी शेअर बाजारात प्रि ओपनिंग सेशनमध्ये GRM ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ओपन झाले होते. आणि हळूहळू शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी GRM ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 1.17 टक्के घसरणीसह 219.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 5 दिवसात शेअरने 23 टक्के परतावा दिला

मागील 5 दिवसात GRM ओव्हरसीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात GRM ओव्हरसीज कंपनीच्या शेअरची किंमत 31 टक्के वाढली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1036 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 498 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 159 रुपये होती.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये GRM ओव्हरसीज स्टॉक 212 रुपये किमतीवर ओपन झाला होता, आणि 230 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. GRM ओव्हरसीज लिमिटेड ही कंपनी 1974 साली स्थापन झाली होती. या कंपनीने बासमती तांदळाच्या निर्यातीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मागील काही वर्षांपासून कंपनीने आपली उत्पादने विविध देशात पोहोचवली आहेत.

GRM ओव्हरसीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः तांदूळ उत्पादन, आयात-निर्यात संबंधित व्यवसाय करते. GRM ओव्हरसीज कंपनी आता FMCG कंपनी व्यवसायात प्रवेश करत आहे. सुरुवातीला या कंपनीने मध्य पूर्व, यूके आणि यूएसएमध्ये तांदूळ निर्यात व्यवसाय करायला सुरुवात केली होती. आता कंपनीची उत्पादने जग भरात 38 देशांमध्ये निर्यात केली जात आहे. GRM ओव्हरसीज कंपनी भारतातील तिसरी सर्वात मोठी तांदूळ निर्यातदार कंपनी म्हणून ओळखली जाते.

काही दिवसांपूर्वी GRM Overseas कंपनीने देशांतर्गत बाजारात 10x शक्ती उत्पादन पोर्टफोलिओच्या रूपात ब्रँडेड FMCG उत्पादने वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. GRM Overseas Ltd कंपनीची तिमाही आणि वार्षिक कामगिरी पहिली तर आपल्याला समजेल की, कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे.

मागील 3 वर्षांत शेअरने 615 टक्के परतावा दिला

मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 615 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 955 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 6700 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GRM Overseas Share Price today on 08 September 2023.

हॅशटॅग्स

#GRM Overseas Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x