19 April 2025 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समधील अप्पर सर्किट थांबेना, अदाणींच्या टेलिकॉम एन्ट्रीने आशा पल्लवित

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ज्येष्ठ भारतीय उद्योगपती गौतम अदानी दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अदानी डेटा नेटवर्क्स, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी 5 जी लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. दूरसंचार विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीतून ही बाब उघड झाली आहे. लिलावात अदानी समूहाच्या सहभागाबद्दल बाजारातील तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले असून त्यामुळे स्पेक्ट्रमच्या किमतींचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे, असे मत व्यक्त केले आहे.

नेक्स्ट जनरेशन स्पेक्ट्रमचा लिलाव २६ जुलैपासून सुरू होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अर्जदारांना १९ जुलैपर्यंत मुदत आहे. त्यासाठी शुक्रवारपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते आणि गेल्या शनिवारी अदानी समूहाचा अर्जही प्राप्त झाला होता, याची अधिकृत माहिती सुद्धा समोर आली आहे.

विद्यमान टेलिकॉम कंपन्यांसाठी अदानी समूहाचे हे पाऊल नकारात्मक मानून बोफा सिक्युरिटीज विचार करत असून यामुळे दीर्घकाळ तसेच लिलावात स्पर्धा वाढेल. गोल्डमन सॅक्स या ग्लोबल फर्मच्या मते, अदानी समूह स्पेक्ट्रम खरेदी करण्यात यशस्वी झाला तर 5 जी मधील स्पर्धा वाढेल आणि कंपनी ग्राहक मोबाईल सेवा व्यवसायातही उतरू शकेल.

काही ब्रोकरेज कंपन्यांनी आश्चर्य व्यक्त केले :
थेट स्पेक्ट्रम वाटपाची वाट न पाहता अदानी समूह लिलावात बोली का लावणार, असा प्रश्न स्पेक्ट्रम लिलावात सहभागी झालेल्या सीएलसी या ब्रोकरेज कंपनीला पडला आहे. अदानी समूहाच्या बोलीमुळे स्पेक्ट्रमच्या किमतींबाबत अनिश्चितता निर्माण होईल, असं सीएलसीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. याआधी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्यामध्ये लिलावात बरीच स्पर्धा होईल असं मानलं जात होतं, मात्र आता अदानीच्या येण्याने सर्व काही बदललं आहे.

अदानी समूहाचा टॉवर कंपन्या ऍक्वायर करण्यावर भर?
अदानी समूहाचा मागील इतिहास पाहता या समूहाचा भर हा इतर संबंधित कंपन्या ऍक्वायर करून स्पर्धकांवर विजय प्राप्त करणे असाच राहिला आहे. त्यामुळे 5G स्पेक्ट्रमच्या लिलावापूर्वी अचानक अदानी समूहाचं नावं प्रकाशझोतात आल्याने त्यांची मोठी योजना असणार यात वाद नाही. स्पर्धकांना जोरदार टक्कर देण्यासाठी अदानी समूह टॉवर उभारणाऱ्या तसेच इतर संबंधित कंपन्या विकत घेईल किंवा त्यात गुंतवणूक करेल असं तज्ज्ञ सांगतात. त्यामध्ये सध्या सर्वाधिक मोबाईल टॉवरचं जाळं असणाऱ्या आणि सध्या प्रचंड तोटयात असणाऱ्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या खरेदीचा विचार देखील होऊ शकतो असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पुढे अदानी समूहाची काय योजना येते ते पाहावं लागणार आहे.

GTL Infra Stock Price :
जीटीएल शेअर सध्या मजबूत तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय. मागील ४ ट्रेडिंग सेशन्समध्ये हा शेअर अप्पर सर्किटमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. ५जी स्पेक्ट्रम आणि त्यामुळे संभाव्य वाटू लागलेले आशेचे किरण या कंपनीला पुन्हा उभारी घेण्यास मदत करतील अशी गुंतवणूकदारांची भावना आहे. हा एक पेनी स्टॉक असल्याने यामध्ये गुंतवणूक करणे तितकेच धोक्याचे देखील आहे. मात्र जिओ, एअरटेल, आयडिया-वोडाफोन यांच्यासहित अदानी ग्रुप सुद्धा या क्षेत्रात उतरल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे शेअर तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: GTL Infra Share Price in upper circuit after Adani Group entry in telecom sector check details 20 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या