31 January 2025 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
x

GTL Infra Share Price | 3 रुपयाचा GTL इन्फ्रा शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, 1 महिन्यात 142% परतावा दिला

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा पेनी स्टॉक दररोज अप्पर सर्किट हीट करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 3.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या पेनी स्टॉक कंपनी अंश )

अवघ्या 14 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 100 टक्के वाढले आहेत. याकाळात हा पेनी स्टॉक 1.49 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहचला आहे. आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 4.74 टक्के वाढीसह 3.76 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात 142.58% परतावा दिला
भारतातील दिग्गज विमा कंपनी एलआयसीने देखील जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 3.33 टक्के भागभांडवल आहे. यासह अनेक खाजगी बँकांनी देखील जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक होल्ड केला आहे. मागील एका वर्षात या शेअरने 370 टक्के परतावा दिला आहे, तर मागील एका महिन्यात 142.58% परतावा दिला आहे.

यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 12.07 टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 7.36 टक्के, बँक ऑफ बडोदाने 5.68 टक्के, इंडियन ओव्हरसीज बँकने 5.23 टक्के, कॅनरा बँकने 4.05 टक्के आणि ICICI बँकेने 3.33 टक्के भागभांडवल धारण केले आहेत. प्रवर्तकांकडे कंपनीचे फक्त 3.28 टक्के शेअर्स आहेत.

स्टॉक सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये
GTL इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 88.76 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये पोहचला आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक S&P BSE SmallCap इंडेक्सचा भाग आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,995.87 कोटी रुपये आहे.

मागील एका आठवड्यात 26.27 टक्के परतावा
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन आठवड्यात हा स्टॉक 38.60 टक्के वाढला आहे. 2024 या वर्षात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 119 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 272 टक्के वाढवले आहेत.

मागील 5 वर्षात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकची किंमत 292 टक्के मजबूत झाली आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः वायरलेस टेलिकॉम ऑपरेटरद्वारे सामायिक केलेले टेलिकॉम टॉवर आणि कम्युनिकेशन स्ट्रक्चर्स उभारण्याचा आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचा व्यवसाय करते. सध्या या कंपनीकडे भारतातील सर्व 22 दूरसंचार मंडळांमध्ये 26,000 टॉवर्स आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price NSE Live 03 July 2024.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x