18 November 2024 2:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

GTL Infra Share Price | 20 दिवसात 150% परतावा देणारा शेअर 2 दिवसात 11% घसरला, स्टॉक BUY करावा की Sell?

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स सलग तेजीनंतर आता विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसापासून हा स्टॉक सातत्याने अप्पर सर्किट हीट करत होता. आता हा स्टॉक प्रचंड नफा वसुलीला तोंड देत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( जीटीएल इन्फ्रा कंपनी अंश )

अवघ्या 20 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 150 टक्के वाढली आहे. या काळात हा स्टॉक 1.70 रुपये किमतीवरून 4.13 रुपये किमतीवर पोहचला आहे. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी जीटीएल इन्फ्रा स्टॉक 5.10 टक्के घसरणीसह 3.72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मागील अनेक दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत होते. परकीय गुंतवणूकदारांसोबतच एलआयसी, बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँक या सारख्या दिग्गज संस्थांनी देखील जीटीएल इन्फ्रा स्टॉकमध्ये पैसे लावले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,315.02 कोटी रुपये आहे.

मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26.91 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 178.52 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. अवघ्या सहा महिन्यांत जीटीएल इन्फ्रा स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 154.60 टक्क्यांनी वाढवले आहे.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने गेल्या महिनाभरात 121.18 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, तर बीएसई टेलिकॉम निर्देशांकात 9.22 टक्के आणि सेन्सेक्समध्ये 4.48 टक्के वाढ झाली आहे. बीएसईवर आतापर्यंत काउंटरमध्ये 21.45 लाख शेअर्सचे ट्रेड झाले, तर गेल्या महिन्याभरात सरासरी 795.5 लाख शेअर्सची विक्री झाली होती. 08 जुलै 2024 रोजी या शेअरने 4.35 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. 30 ऑगस्ट 2023 रोजी हा शेअर 0.7 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 406.10 टक्के वाढली आहे. मागील 2 वर्षात, 3 वर्षात, 5 वर्षात आणि 10 वर्षांत हा स्टॉक अनुक्रमे 242.98 टक्के, 63.39 टक्के, 446.05 टक्के आणि 15.28 टक्के दराने वाढला आहे. जर तुम्ही 7 जुलै 2023 रोजी जीटीएल इन्फ्रा स्टॉकमध्ये 0.85 रुपये किमतीवर असताना 50,000 रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणकीचे मूल्य 244117.65 रुपये झाले असते.

मार्च 2024 तिमाहीत जीटीएल इन्फ्रा कंपनीला 214.72 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 755.87 कोटी रुपये तोटा झाला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर या कंपनीचा तोटा कमी झाला आहे. मागील वर्षीच्या मार्च तिमाहीत या कंपनीने 377.87 कोटी रुपये मूल्याची सेल्स केली होती.

वार्षिक आधारावर हे प्रमाण आता 12.38 टक्के घसरून 331.09 कोटी झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जीटीएल इन्फ्रा कंपनीला 681.36 कोटी रुपये निव्वळ तोटा झाला होता. मागील वर्षात कंपनीला 1816.91 कोटी तोटा झाला होता. 2022-23 मधील 1457.86 कोटी रुपये वार्षिक विक्रीच्या तुलनेत 2023-24 मध्ये कंपनीची विक्री 5.89 टक्के घसरून 1372.01 कोटी रुपये झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price NSE Live 09 July 2024.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x