29 August 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मागील 1 वर्षात दिला 250% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार? अपडेट नोट करा Infosys Share Price | इन्फोसिस शेअर चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Numerology Horoscope | 30 ऑगस्ट 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell? Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअरला तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा, संधी सोडू नका Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत अपडेट आली! शेअरची खरेदी वाढली, शॉर्ट टर्म मध्ये दिला 78% परतावा
x

GTL Infra Share Price | GTL इंफ्रा शेअरमध्ये घसरण, गुंतवणुकदार चिंतित, स्टॉक पुन्हा तेजीत येणार?

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | जीटीएल इंफ्रा या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजीत धावत होते. मात्र आता या कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. जीटीएल इंफ्रा कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 17 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. त्यांनतर हा स्टॉक चर्चेत आला. आता हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. ( जीटीएल इंफ्रा कंपनी अंश )

13 जून 2024 रोजी जीटीएल इन्फ्रा स्टॉक 5 टक्क्यांच्या घसरणीसह 2.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. त्यानंतर या स्टॉकने सलग 17 दिवस 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हीट केला होता. 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.15 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी जीटीएल इंफ्रा स्टॉक 5.10 टक्के घसरणीसह 3.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जीटीएल इंफ्रा स्टॉकबाबत विशेष बाब म्हणजे, अनेक परकीय गुंतवणूकदारांसोबतच एलआयसी, बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँक यासारख्या दिग्गज संस्थांनी देखील या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत.

2024 या वर्षात जीटीएल इंफ्रा स्टॉक 205.15 टक्के मजबूत झाला आहे. 5 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर 4.80 टक्के वाढीसह 4.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते. जीटीएल इन्फ्रा या स्मॉलकॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,315.02 कोटी रुपये आहे.

मागील एका आठवड्यात जीटीएल इंफ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26.91 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 178.52 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 155 टक्क्यांनी वाढवले आहेत.

जर तुम्ही 7 जुलै 2023 रोजी जीटीएल इंफ्रा स्टॉकवर 0.85 रुपये दराने 50,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2,44,117.65 रुपये झाले असते. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला 1,94,117.65 रुपये निव्वळ नफा मिळाला असता, ज्याचे ROI प्रमाण 388.24 टक्के आहे. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीचा तोटा कमी होऊन 214.72 कोटी रुपयेवर आला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 755.87 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

मागील वर्षी जीटीएल इंफ्रा कंपनीने 377.87 कोटी रुपयेची विक्री नोंदवली होती. तर मार्च तिमाहीत कंपनीची विक्री 12.38 टक्क्यांनी घसरून 331.09 कोटी रुपये नोंदवली गेली होती. मार्च 2024 ला संपलेल्या 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीला 681.36 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. 2022-23 मध्ये या कंपनीला 1816.91 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. 2023-24 मध्ये कंपनीची विक्री 1457.86 कोटी रुपये झाली होती. 2022-23 मध्ये कंपनीची विक्री 5.89 टक्के घसरणीसह 1372.01 कोटी रुपयेवर आली आहे.

GTL इन्फ्रा ही स्मॉलकॅप कंपनी मुख्यतः वायरलेस टेलिकॉम ऑपरेटर्सच्या सामायिक टेलिकॉम टॉवर्स आणि कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालन करण्याचा व्यवसाय करते. जीटीएल इंफ्रा कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये भारतातील 22 दूरसंचार मंडळामध्ये स्थित असलेले 26,000 टॉवर्स सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price NSE Live 11 July 2024.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x