31 January 2025 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
x

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी शेअर तेजीत, आज अप्पर सर्किटवर, शेअर प्राईस 1 रुपया 25 पैशावर, पुढची टार्गेट प्राईस?

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | शेअर बाजारात असेल काही पेनी स्टॉक असतात, जे गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून देत असतात. असाच एक पेनी स्टॉक गुंतवणूकदारांच्या नजरेत आला आहे. जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या शेअर अल्पावधीत सुसाट तेजी पाहायला मिळत आहे.

शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 16.67 टक्के वाढीसह 1.05 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 60 पैसे होती. तर उच्चांक किंमत पातळी 1.80 रुपये होती. आज गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 8.70 टक्के (NSE Afternoon 01:25) वाढीसह 1.25 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

मागील घसरण:

एकेकाळी GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 99.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 0.85 पैसे किमतीवर आला आहे. ज्या लोकांनी 15 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3400 रुपये झाले आहेत. गुंतवणूकदारांना या पेनी स्टॉकने दीर्घ काळात चांगलाच दणका दिला आहे. असे पेनी स्टॉक गुंतवणुकीसाठी फार धोकादायक असतात.

पेनी स्टॉक म्हणजे :

पेनी स्टॉक हे स्मॉल कॅप कंपनीचे असे शेअर्स असतात, ज्यांची किंमत काही पैसे किंवा काही रुपये असते. शक्यतो हे शेअर्स 10 रुपयांपेक्षा कमी किमतीवर असतात. पेनी स्टॉकची तरलता खूप कमी असते. म्हणजेच बाजारात या कंपनीचे शेअर्स जास्त खरेदी विक्री केले जात नाही. अशा पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक मानले जाते. मात्र काही गुंतवणुकदार पेनी स्टॉकमध्ये गुंतवणुक करून भरघोस कमाई करतात.

MPS Infotechrics पेनी स्टॉक :

MPS Infotechrics Ltd कंपनीचे बाजार भांडवल 169.85 कोटी रुपये आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 0.45 पैसे किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 85 पैसे होती. तर नीचांक पातळी किंमत 35 पैसे होती. मागील एका वर्षात MPS Infotechrics कंपनीचे शेअर्स 33 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 21.26 रुपयेवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 98 टक्क्यांच्या घसरणीसह 45 पैशांवर पोहोचला आहे. 23 वर्षापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 2000 रुपये झाले आहे.

पेनी स्टॉक्समधील धोका :

चांगला परतावा देणाऱ्या पेनी स्टॉक कंपन्या शोधणे खूप कठीण असते. कोणत्याही माहितीशिवाय पेनी शेअर्समध्ये पैसे लावणे खूप जोखमीचे असते. अशा शेअर्सची तरलता आणि प्रवाह खूप कमी असतो. बरेच वेळा हे शेअर्स लोअर सर्किट मध्ये अडकून राहतात. म्हणजेच शेअर बाजारात ट्रेडिंगसाठी शेअर्स मर्यादित होतात. अनेक पेनी स्टॉक कंपन्यांचे बाजार भांडवल देखील खूप कमी असते आणि शेअरची तरलता देखील खूप असते. यामुळे अशा शेअरच्या किमतीत फेरफार किंवा घोटाळा करणे खूप सोपे असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price today on 14 September 2023.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x