8 July 2024 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे 08 जुलै सोमवारचे राशिभविष्य | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल? Numerology Horoscope | 08 जुलै 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Pandharpur Railway Ticket | पंढरपुरसाठी कन्फर्म तिकीटची चिंता मिटली, 64 विशेष ट्रेन, राज्यभरातून बुकिंग सुरु Joint Home Loan | जॉइंट लोन घेऊन घर घेण्याचे स्वप्न असेल तर 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्या Salary 50-30-20 Formula | पगारदारांनो! महिना 50,000 रुपये पगार असूनही लगेच संपतो? हा फॉर्म्युला चिंता मुक्त करेल RVNL Share Price | बुलेट ट्रेन गतीने परतावा मिळणार, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करून फायदा घ्या BEML Share Price | झटपट पैसा मिळतोय! मागील 1 महिन्यात दिला 38 टक्के परतावा, खरेदी करा हा शेअर
x

GTL Infra Share Price | श्रीमंत करणार GTL इन्फ्रा शेअर, 14 दिवसात दिला 100% परतावा, पुढेही मल्टिबॅगर?

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉलकॅप कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअर्समध्ये एलआयसीने देखील गुंतवणूक केली आहे. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

मागील 14 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स दुप्पट वाढले आहेत. मागील 14 दिवसात हा स्टॉक 1.49 रुपयेवरून वाढून 3.11 रुपये किमतीवर पोहचला आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 4.82 टक्के वाढीसह 3.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 3.33 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये 12.07 टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 7.36 टक्के, बँक ऑफ बडोदाने 5.68 टक्के, इंडियन ओव्हरसीज बँकने 5.23 टक्के, कॅनरा बँकने 4.05 टक्के, आणि ICICI बँकेने 3.33 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 2.98 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 3.11 रुपये किमतीवर पोहचला होता. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,816.57 कोटी रुपये आहे. एलआयसी कंपनीने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.49 रुपये किमतीवर असताना खरेदी केला होता. आता एलआयसी कंपनीच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहे.

मागील एका आठवड्यात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 38.60 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 119 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 272 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 292 टक्के वाढली आहे.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधा, वायरलेस टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे सामायिक केलेल्या टेलिकॉम टॉवर्स आणि कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती, मालकी आणि व्यवस्थापन करण्याचा व्यवसाय करते. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे भारतातील सर्व 22 दूरसंचार मंडळांमध्ये अंदाजे 26,000 टॉवर्सचा पोर्टफोलिओ आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 3.28 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price NSE Live 28 June 2024.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x