25 April 2025 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल EPFO Money News | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो तुमची बेसिक सॅलरी किती? खात्यात इतकी रक्कम जमा होणार, अपडेट पहा Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा Horoscope Today | 25 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रावरचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रावरचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 25 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | इरेडा शेअरबाबत महत्वाचे संकेत; मल्टिबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या

GTL Share Price

GTL Share Price | मागील काही दिवसांपासून गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. त्यानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली होती. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के वाढीसह 34.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.99 टक्के घसरणीसह 31.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने गुजरात टूलरूम कंपनीला 65 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. मागील महिन्यात देखील या कंपनीला रिलायन्स कंपनीने 29 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. या दोन्ही कंपन्यांमध्ये एकूण 200 कोटी रुपये मूल्याचा करार झाला आहे. मार्च महिन्यात गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने 62.97 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यानंतर हा स्टॉक जबरदस्त घसरला आहे.

नुकताच गुजरात टूलरूम कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना प्रति शेअर 45 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 20 एप्रिल 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता. गुजरात टूलरूम ही कंपनी आयात-निर्यात आणि पायाभूत क्षेत्रात व्यवसाय करते.

गुजरात टूलरूमला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्याने ब्रोकरेज फर्म स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मने गुजरात टूलरूम स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञाच्या मते, गुजरात टूलरूम स्टॉक दीर्घकाळात 90 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 24 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या