GTL Share Price | स्वस्त शेअर रोज लोअर सर्किट हिट करतोय, स्टॉक स्वस्तात 'BUY' करावा की 'Sell'?
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच गुजरात टूलरूम कंपनीने राइट्स इश्यू आणण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचा राइट्स इश्यू 14 जून ते 12 जुलै 2024 दरम्यान खुला असेल.
गुजरात टूलरूम कंपनीने राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेट म्हणून 5 जून 2024 हा दिवस निश्चित केला आहे. ही कंपनी आपल्या राइट्स इश्यूमधे 61,108,960 इक्विटी शेअर्स 8 रुपये प्रति शेअर किमतीवर ऑफर करणार आहे. गुजरात टूलरूम कंपनीच्या राइट्स इश्यूचा आकार 48.89 कोटी रुपये असेल. यासाठी कंपनीने 11:10 हे प्रमाण निश्चित केले आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.99 टक्के घसरणीसह 18.27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च 2024 च्या तिमाहीत गुजरात टूलरूम कंपनीने 50.29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या नफ्यात मजबूत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीचे उत्पन्न प्रचंड वाढले आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 73 लाख रुपये नफा कमावला होता. गुजरात टूलरूम कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 377.35 कोटी रुपयेवर गेले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1.64 कोटी रुपयेवर गेले होते. कंपनीचा एकूण खर्च वाढून 326.72 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी कंपनीचा खर्च 61 लाख रुपये होता.
गुजरात टूलरूम कंपनीचे एकूण बाजार भांडवल 112.44 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.97 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 11.18 रुपये होती. अहमदाबाद स्थित गुजरात टूलरूम कंपनी मुख्यतः औद्योगिक मशीन आणि उपकरणे तयार करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीने गुजरातमध्ये 572 कोटी रुपये गुंतवणुक करून हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 65 एकर जमीन संपादित केली आहे. आता ही कंपनी हरित ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना आखत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | GTL Share Price NSE Live 31 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL