17 April 2025 7:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

GTL Share Price | GTL शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट स्पीडने परतावा देणार, संधी सोडू नका

GTL Share Price

GTL Share Price | गुजरात टूलरूम या कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. नुकताच GTL Gems DMCC या गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या दुबईस्थित उपकंपनीला एक नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 114 कोटी रुपये आहे. या ऑर्डरमधून कंपनीला 5 टक्के ते 7.5 टक्के प्रॉफिट मार्जिन अपेक्षित आहे. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )

या ऑर्डरची पूर्तता चालू तिमाहीत केली जाणार आहे. गुजरात टूलरूम कंपनीचे एकूण बाजार भांडवल 141.51 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 45.97 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8.40 रुपये होती. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.94 टक्के घसरणीसह 12.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

जागतिक स्तरावर गुजरात टूलरूम कंपनीचा वाढता प्रभाव आणि बाजारपेठेतील मजबूत उपस्थिती यासाठी ही नवीन ऑर्डर महत्त्वाची मानली जात आहे. नवीन ऑर्डरमुळे गुजरात टूलरूम कंपनीचा महसूल आणि नफा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. याशिवाय जीटीएल जेम्स डीएमसीसी कंपनीला भविष्यात अनेक ऑर्डर्स मिळू शकतात. आगामी तिमाहींमध्ये या कंपनीला AED 100 दशलक्ष म्हणजेच 2.28 अब्ज रुपयेपेक्षा जास्त किमतीच्या अतिरिक्त ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.

मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत गुजरात टूलरूम कंपनीने 0.73 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6790.41 टक्क्यांची वाढ झाली आणि कंपनीने 50.30 कोटी रुपये नफा कमावला होता. मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री 22845.12 टक्क्यांनी वाढून 376.30 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 1.64 कोटी रुपये विक्री नोंदवली होती.

मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षात गुजरात टूलरूम कंपनीचा PAT 4995 टक्के वाढून 70.83 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीचा PAT 1.39 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात 2.41 कोटी रुपयेच्या तुलनेत मार्च 2024 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या विक्रीमध्ये 22944.40 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीची विक्री 555.37 कोटी रुपये नोंदवली आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 0.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 12.13 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील तीन वर्षांत गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1560 टक्के परतावा कमावून दिला आहे. अहमदाबाद स्थित गुजरात टूलरूम ही कंपनी मुख्यतः औद्योगिक मशीन्स आणि उपकरणे तयार करण्याचा व्यवसाय करते. गुजरात टूलरूम कंपनीने 1991 मध्ये व्यवसाय सुरू केला होता. ही कंपनी खाणी, खनिजे आणि इतर संबंधित क्रियाकलापांच्या विकास आणि ऑपरेशन व्यवसायात गुंतलेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| GTL Share Price today on 10 August 2024

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या