28 April 2025 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

गुजरातला कोणाची पनवती लागली? मोठा धक्का! महाराष्ट्रातून गुजरातला पळवलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामधून फॉक्सकॉन कंपनी बाहेर पडली

Gujarat Foxconn

Gujarat Foxconn withdrawn from JV with Vedanta | वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत भाजपने शिवसेना पक्ष फोडला आणि शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद देऊन पुणे येथे येणारा फॉक्सकॉन-वेदान्ता प्रकल्प गुजरातला पाठवला होता. मात्र आता गुजरात स्वतःच पेचात अडकल्याचं म्हटलं जातंय. कारण देशात चिप्स (सेमीकंडक्टर) बनवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. तैवानची कंपनी फॉक्सकॉनने भारतीय कंपनी वेदांता लिमिटेडसोबतच्या १९.५ अब्ज डॉलरच्या सेमीकंडक्टर जॉइंट व्हेंचरमधून माघार घेतली आहे.

हा प्रकल्प उभारण्याचा करार गेल्या वर्षी करण्यात आला होता

फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी आणि वेदांता लिमिटेड यांनी गेल्या वर्षी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी करार केला होता. फॉक्सकॉनने वेदांतासोबत संयुक्त उपक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तैवानच्या कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

फॉक्सकॉनने मात्र संयुक्त उपक्रमातून बाहेर पडण्याचे सविस्तर कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र यामागे आगामी लोकसभा निवडणूक तसेच गुजरातमध्ये कुशल कामगार उपलब्ध नसल्याने केवळ राजकीय वादात अडकलेल्या या प्रकल्पात फॉक्सकॉन नुकसान करून घेण्यास तयार नसल्याचं म्हटलं जातंय. तसेच वेदांता कंपनीची मॅनेजमेंट व्यवसायाला निगडित गोष्टी विचारात घेण्यापेक्षा राजकीय दबावाखाली प्लांटबाबत विचार करत असल्याने फॉक्सकॉनने असा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र कंपनीने अधिकृत निवेदनात राजकीय भाष्य न करता थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

फॉक्सकॉन कंपनीने निवेदनात काय म्हटले

फॉक्सकॉनने म्हटले आहे की, “एक शानदार सेमीकंडक्टर कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी” वेदांतासोबत एक वर्षाहून अधिक काळ काम केले. मात्र, त्यांनी हा संयुक्त उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आता वेदांतच्या पूर्ण मालकीच्या युनिटमधून त्याचे नाव काढून टाकण्यात येणार आहे. वेदांताने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फॉक्सकॉन आयफोन आणि अॅपलच्या इतर उत्पादनांचे असेंबलिंग करण्यासाठी ओळखली जाते, परंतु अलीकडच्या वर्षांत आपल्या व्यवसायात विविधता आणण्यासाठी चिप मेकिंगमध्ये विस्तार करीत आहे.

१ लाख लोकांना रोजगार अपेक्षित

अहमदाबादमध्ये 1000 एकर जागेवर हा प्लांट उभारला जाणार आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. प्रस्तावित सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅब्रिकेशन युनिट 28nm तंत्रज्ञान नोड्सवर काम करेल. डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिट लहान, मध्यम आणि मोठ्या अनुप्रयोगांसाठी जनरेशन 8 डिस्प्ले तयार करेल.

संयुक्त उपक्रमात वेदांताचा 60 टक्के हिस्सा

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वेदांतने फॉक्सकॉनसोबत संयुक्त उपक्रमासाठी हातमिळवणी केली आणि भारत सरकारच्या सेमीकंडक्टर उत्पादन योजनेसाठी अर्ज केला. या संयुक्त उपक्रमात वेदांतचा 60 टक्के आणि फॉक्सकॉनचा 40 टक्के हिस्सा होता. दोन्ही कंपन्यांना एकत्रितपणे पुढील दोन वर्षांत प्रकल्प उभारायचा होता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gujarat Foxconn withdrawn from JV with Vedanta check details on 10 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat Foxconn(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या