15 January 2025 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

Gulshan Polyols Share Price | मालामाल शेअर! गुलशन पॉली ओल्स शेअरने 3 वर्षात 741 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर

Highlights:

  • Gulshan Polyols Share Price
  • 1 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर
  • मागील एका वर्षात परतावा
  • मागील 3 वर्षात 741 टक्के परतावा दिला
  • बोनस शेअर म्हणजे काय ?
Gulshan Polyols Share Price

Gulshan Polyols Share Price | गुलशन पॉली ओल्स या केमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 1,370.59 कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.45 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केल्याने स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे.

1 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर

गुलशन पॉली ओल्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. बोनस इश्यूसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी गुलशन पॉली ओल्स कंपनीचे शेअर्स 3.37 टक्के वाढीसह 273.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुलशन पॉली ओल्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 21 जून हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 5 शेअर्सवर 1 रुपये दर्शनी मूल्य असलेला एक बोनस शेअर मोफत देणार आहे.

मागील एका वर्षात परतावा

या बातमीनंतर शुक्रवार, 2 जून रोजी गुलशन पॉलिओल्स कंपनीचे शेअर्स 3.45 टक्के वाढीसह 263.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एक महिन्यापासून या कंपनीच्या शेअरची किंमत फ्लॅट राहिली आहे. मात्र मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 15.06 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मागील 3 वर्षात 741 टक्के परतावा दिला

मागील तीन वर्षांत गुलशन पॉली ओल्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. तीन वर्षांपूर्वी गुलशन पॉलिओल्स कंपनीचे शेअर्स 31.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जे आता वाढून 263.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 3 वर्षात गुलशन पॉली ओल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 741 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बोनस शेअर म्हणजे काय ?

अनेक कंपन्या आपल्या शेअर धारकांना प्रोत्साहन म्हणून मोफत बोनस शेअरचे वाटप करतात. बोनस शेअरचे प्रमाण कंपनीचे संचालक मंडळ निश्चित करत असते. बोनस शेअर्स जाहीर करताना रेकॉर्ड तारीख, एक्स तारीख आणि इश्यू तारीख जाहीर केल्या जातात. रेकॉर्ड तारीखच्या दिवशी बोनस शेअर्स कोणाला दिले जातील हे ठरविले जाते.

ज्या लोकांकडे रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असतील तर बोनस शेअर्स मिळवण्यास पात्र असतात. एक्स बोनस तारख सहसा रेकॉर्ड तारखेच्या एक दिवस आधी असते. बोनस शेअर्ससाठी पात्र होण्यासाठी गुंतवणूकदाराने कंपनीचा स्टॉक एक्स डेटच्या किमान एक-दोन दिवस पूर्वी खरेदी करून ठेवणे किंवा होल्ड करणे आवश्यक आहे, नाहीतर बोनस शेअर्स मिळत नाही.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gulshan Polyols Share Price today on 05 June 2023.

हॅशटॅग्स

Gulshan Polyols Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x