16 January 2025 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

HAL Share Price | HAL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, पुन्हा मल्टिबॅगर परतावा - Marathi News

Highlights:

  • HAL Share Price – हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश
  • सरकारी कंपनीला महारत्न दर्जा – HAL
  • मागील 1 वर्षात शेअरने 134% परतावा दिला – NSE: HAL
HAL Share Price

HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीबाबत एक नवीन अपडेट आली आहे. लवकरच या सरकारी कंपनीला ‘महारत्न’ दर्जा मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार एचएएल कंपनीला 2024 या वर्षाच्या अखेरीस महारत्न कंपन्यांच्या यादीत सामील केले जाईल. महारत्न दर्जा मिळाल्यानंतर ही कंपनी अधिक स्वातंत्र्याने व्यवसाय विस्तार करू शकेल. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी (HAL Share Price NSE) हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 4645.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होत. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश)

सरकारी कंपनीला महारत्न दर्जा
यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये भारत सरकारने ऑइल इंडिया सरकारी कंपनीला महारत्न दर्जा बहाल केला होता. अलीकडेच RailTel Corporation of India Limited, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आणि सतलुज जल विद्युत निगम लिमिटेड या चार सरकारी कंपन्यांना ‘नवरत्न’ दर्जा बहाल केला होता. सध्या भारतात एकूण 13 महारत्न कंपन्या आहेत. यामध्ये भेल, बीपीसीएल, कोल इंडिया, गेल, एचपीसीएल, इंडियन ऑइल, ओएनजीसी, पॉवर ग्रिड, सेल, ऑइल इंडिया, आरईसी आणि पीएफसी या कंपन्या सामील आहेत.

महारत्न किंवा नवरत्न कंपनीचा दर्जा CPSE कंपन्यांना दिला जातो. नवरत्न दर्जा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी असतो. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्या सहभागी होऊ शकत नाहीत. अपग्रेडेशननंतर केवळ नवरत्न कंपन्यांना महारत्न दर्जा बहाल केला जातो.

मागील 1 वर्षात शेअरने 134% परतावा दिला
महारत्न दर्जा मिळाल्यानंतर एचएएल कंपनी भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकल्पात 15 टक्के भांडवल गुंतवणुक करू शकते. आणि सरकारी परवानगीशिवाय महारत्न दर्जा असलेली कंपनी परदेशात 5,000 कोटी रुपयेपर्यंत गुंतवणूक करू शकते. मागील एका वर्षात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 134 टक्के परतावा कमावून दिला आहे. जुलै 2024 मध्ये एचएएल स्टॉक 5,674 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचला होता.

Latest Marathi News | HAL Share News 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x