14 January 2025 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

HAL Share Price | HAL शेअरमध्ये तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1045% परतावा दिला - Marathi News

Highlights:

  • HAL Share PriceNSE: HAL – हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश
  • कंपनीच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ
  • मागील 5 वर्षात 1045% परतावा दिला – NSE:HAL
  • कंपनी ऑर्डर बुक – HAL Share
  • कंपनीला महारत्न दर्जा मिळण्याची शक्यता
HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त तेजीत व्यवहार करत आहे. या कंपनीला भारत सरकार महारत्न दर्जा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या (NSE: HAL) शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही सरकारी कंपनी विविध प्रकारचे हेलिकॉप्टर्स आणि फायटर जेट्स बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी भारतीय लष्करासाठी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर बनवणारी ही एकमेव कंपनी आहे. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश)

कंपनीच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ
या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, हॉक अॅडव्हान्स्ड डेट ट्रेनर, डॉर्नियर डो -228 मल्टी पर्पज लाइट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट एसयू -30 एमकेआय यासारख्या उत्पादनांचा समावेश होतो. आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.66 टक्के वाढीसह 4448.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 वर्षात 1045% परतावा दिला
मागील 5 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1045 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 116 टक्के वाढली आहे. 20 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 2.12 टक्के वाढीसह 4321 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 सप्टेंबर 2019 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 378 रुपये होती. मे 2020 मध्ये कोरोना काळात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 267 रुपयेपर्यंत खाली आले होते. भारत सरकार परदेशातून संरक्षण उपकरणे आयात करण्याऐवजी देशातच निर्माण करण्यावर भर देत आहे, याचा फायदा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला होत आहे.

कंपनी ऑर्डर बुक
या कंपनीची ऑर्डर बुक 1 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीवर पोचली आहे. नुकताच या कंपनीला सरकारकडून SU-30MKI विमानांसाठी 240 L-31FP एरो इंजिन बनवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डर्सचे एकूण मूल्य 2600 कोटी रुपये आहे. 31 मार्च 2024 अखेर एचएएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 94,000 कोटी रुपये होता. जून तिमाहीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने वार्षिक आधारावर महसूल संकलनात 11 टक्के वाढ नोंदवली होती. या तिमाहीत कंपनीने 4,350 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2024 तिमाहीत कंपनीचा नफा 7,621 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

कंपनीला महारत्न दर्जा मिळण्याची शक्यता
पुढील काळात या कंपनीला महारत्न दर्जा मिळण्याची शक्यता आहे. सध्या भारतात 13 सरकारी कंपन्यांना महारत्न दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये BHEL, BPCL, कोल इंडिया, GAIL, इंडियन ऑइल, ONGC, पॉवर ग्रिड, सेल, ऑइल इंडिया, REC आणि PFC या सरकारी कंपन्यांचा समावेश होतो. महारत्न दर्जा मिळाल्यानंतर कोणतीही कंपनी भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकल्पात 15 टक्के रक्कम गुंतवणूक करू शकते. तसेच सरकारी परवानगीशिवाय परकीय प्रकल्पात देखील 5,000 कोटी रुपये गुंतवणूक करू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HAL Share Price 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x