21 April 2025 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH
x

HAL Share Price | भरवशाचा मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, खरेदी करणार?

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.1 टक्के वाढीसह 3,225.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. नुकताच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाने 5,250 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्मने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 3,129 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के वाढीसह 3,241.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

परकीय ब्रोकिंग फर्म यूबीएसने नुकताच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर 3,600 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. नुकताच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला मिग-29 विमानांसाठी एरो इंजिन खरेदी, उत्पादन आणि पुरवठ्यासाठी 5250 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

हे एरो इंजिन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या कोरापुट विभागाद्वारे तयार केले जाणार आहेत. हे इंजिन भारतीय हवाई दलाच्या MIG-29 फ्लीटची परिचालन क्षमता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा करार भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही हातभार लावणार आहे.

मागील महिन्यात फेब्रुवारी 2024 मध्ये, PTC इंडस्ट्रीज कंपनीने विमान आणि हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, घटक आणि सुटे भाग यावर संयुक्तपणे काम करण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला होता. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार सध्या 80,000 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2026 पर्यंत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 2.4 लाख कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे.

भारत सरकारतर्फे संरक्षण विभागाच्या आधुनिकीकरणासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पात 5.94 लाख कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत या निधीत 13 टक्के अधिक वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात निफ्टी-50 निर्देशांक 14 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 05 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या