
HAL Share Price | एचएएल कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्याच्या वाढीसह 4752 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( एचएएल कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 5,725 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ही किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 26 टक्क्यांनी जास्त आहे. मागील आठवड्यात शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये एचएएल स्टॉक 2.42 टक्के वाढीसह 4,715.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने मार्च 2024 मध्ये 18,000 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 14,769 कोटी रुपये नफा कमावला होता. 31 मार्च 2024 पर्यंत या कंपनीने 29,810 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. एचएएल कंपनीकडे सध्या 94,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर्स प्रलंबित आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























