24 December 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

HAL Share Price | भरवशाचा PSU शेअर 3 महिन्यात मोठा परतावा देणार, यापूर्वी 1411% परतावा दिला

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टच्या तज्ञांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 5615 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

14 जून 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 357 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 5,188 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1411 टक्के परतावा कमावून दिला आहे.

केंद्र सरकारने आपल्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत संरक्षण क्षेत्राची निर्यात 50,000 कोटी रुपयेपर्यंत वाढवण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. याचा फायदा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या कंपन्यांना होऊ शकतो. त्यामुळे आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड स्टॉक 3 महिन्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील 3 महिन्यात 5615 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

मागील 2 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 452 टक्के नफा कमावून दिला आहे. 4 जून रोजी या कंपनीचे शेअर्स जबरदस्त घसरले होते. मात्र निवडणूक निकालानंतर अवघ्या काही दिवसात हा स्टॉक पुन्हा 28 टक्के वाढला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 4748 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील 1 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक 180 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5434 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1768 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.57 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 17 June 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x