
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय संरक्षण क्षेत्रातील सरकारी मालकीची कंपनी विमान आणि हेलिकॉप्टरचे उत्पादन, दुरुस्ती आणि देखभाल या व्यवसायात गुंतलेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी विमान वाहतूक उद्योगात सक्रिय व्यवसाय करते. ही कंपनी प्रगत एरोस्पेस सोल्यूशन्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम करते. 15 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने फ्रान्सच्या Saffron Helicopter Engines या कंपनीसह व्यापारी करार केला होता. या अंतर्गत दोन्ही कंपन्यानी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संयुक्त उपक्रम अंतर्गत हेलिकॉप्टर इंजिनचे डिझाईन, विकास, प्रमाणीकरण, उत्पादन आणि विक्री संबंधित व्यापारी कामकाज केले जातील. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 3,856.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि Saffron Helicopter Engines द्वारे स्थापन केल्या जाणाऱ्या संयुक्त उपक्रमांत भारतीय मल्टीरोल हेलिकॉप्टर आणि डेक बेस्ड मल्टीरोल हेलिकॉप्टरसाठी इंजिन बनवण्याचे कार्य केले जाणार आहे. नुकताच केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी मलेशियातील क्वालालंपूरमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन केले होते.
भारत आणि मलेशिया यांच्यात द्विपक्षीय संरक्षणविषयक औद्योगिक सहकार्य वाढवण्यासाठी कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. यामुळे दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला आपला व्यवसाय विस्तार करणे सोपे जाईल.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी भारतीय संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी आहे. मागील 5 वर्षांत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 391.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. यासह हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठ्या प्रमाणात लाभांश देखील वाटप केले आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षाचे जबरदस्त निकाल जाहीर केले होते. HAL कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह 26,982 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या आर्थिक वर्षात कंपनीचा ऑपरेशनल नफा 23 टक्क्यांच्या वाढीसह 6663 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 5811 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स इतके वाढले आहेत, की शेअरची किंमत आता 3,858.00 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील 1 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 111.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 307 टक्के परतावा कमावून दिला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 30 ऑक्टोबर 2020 रोजी 687 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीच्या तुलनेत स्टॉक आता 5 पट अधिक वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.




























