18 November 2024 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

HAL Share Price | मल्टिबॅगर हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्स निम्म्या किमतीवर खरेदी करणार? स्टॉक स्प्लिट योजना जाणून घ्या

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीने स्टॉक विभाजन करण्याची घोषणा केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन तुकड्यामध्ये विभाजित केले जाणार आहे. मागील 1 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 105.40 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी

HAL कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3,950 रुपये होती. तर नीचाकी पातळी किंमत 1.718 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,21,723.74 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.095 टक्के घसरणीसह 3,697.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकीवर 411 टक्के परतावा :

मागील 6 महिन्यांत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 46.43 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात शेअरची किंमत 105.40 टक्के वाढली आहे . YTD आधारे हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक 45.54 टक्के मजबूत झाला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 256 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात शेअरची किंमत 411 टक्के वाढली आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीची स्थापना 23 डिसेंबर 1940 रोजी बंगलोर या ठिकाणी करण्यात आली होती. हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड कंपनीने जानेवारी 1951 पासून हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड या नावाने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय वाढीला सुरुवात केली. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याच्याकडे एरोस्पेस क्षेत्रात विस्तृत डिझाइन आणि विकास क्षमता आहे.

HAL कंपनीच्या संचालक मंडळाने 27 जून 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 2023 च्या आर्थिक वर्षासाठी 15 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. तर मार्च 2023 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने प्रति शेअर 20 रुपये दुसरा अंतरिम लाभांश वाटप केला होता.

आर्थिक वर्ष 2022-23 साठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने अंतरिम लाभांश म्हणून एकूण 40 रुपये प्रति इक्विटी शेअर वाटलं केले होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या सध्याच्या शेअरच्या किमतीवर HAL चे लाभांश उत्पन्न 1 टक्के पेक्षा किंचित जास्त आहे. तेजस विमान आणि हलके लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी जगात प्रसिद्ध आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या या उत्पादनांना मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही प्रसिध्दी मिळाली आहे. भारतीय संरक्षण दलासाठी एचएएल कंपनी विशेष प्रकारचे जेट बनवते. ग्लोबल बोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनली देखील हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price today on 28 June 2023.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x