5 November 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Harsha Engineers IPO | हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 232 रुपये प्रीमियमवर पोहोचला, हा स्टॉक देणार बंपर IPO ओपनिंग

Harsha Engineers IPO

Harsha Engineers IPO | बऱ्याच काळानंतर शेअर बाजारात एक धमाकेदार IPO आला आहे, ज्याने गुंतवणूकदारांना खुश केले आहे. ग्रे मार्केटमध्ये हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. स्टॉक सूचीबद्ध झाल्यावर जबरदस्त परतावा देईल, ह्यात काही शंका नाही. शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलच्या शेअर्सला 232 रुपयांचा भाव मिळत आहे.

हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलच्या IPO ला अपेक्षे पेक्षा जास्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हर्षा इंजिनियर्सचा IPO खुला झाल्यावर सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी 10.35 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. कंपनीच्या IPO मध्ये, 1,68,63,795 शेअर्स ऑफर करण्यात आले आहेत, ज्यात एकूण 17,45,50,545 शेअर्सची मागणी करण्यात आली आहे. ग्रे मार्केटमध्येही हर्षा इंजिनियर्स आयपीओ प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. वाढत आहे.बाजार निरीक्षकांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये शुक्रवारी हर्षा इंजिनियर्सच्या शेअर्सला 232 रुपयांचा प्रीमियम मिळत आहे.

प्रीमियम किमतीवर लिस्टिंग होण्याची शक्यता :
हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल IPO ची ऑफर किंमत 314 रुपये ते 330 रुपये दरम्यान आहे. कंपनीचे शेअर्स 330 रुपयांच्या प्राइस बँडवर वाटप केले जाऊ शकतात. ग्रे मार्केट मध्ये स्टॉक ऑफर किमतीच्या वर 232 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होते. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स 562 रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतात, असा तज्ञांचा अंदाज आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील.

IPO मध्ये एकूण फंड कलेक्शन:
हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलच्या IPO द्वारे कंपनी 755 कोटी रुपये उभारणार आहे. या निधीतील 455 कोटी रुपये कंपनीचा उद्योग वाढीसाठी वापरणार आहे. त्याच वेळी, उर्वरित पैसे कंपनीच्या पप्रमोटरकडे जातील. कंपनी सुमारे 270 कोटी रुपये कर्ज परत फेडीसाठी वापरणार आहे, आणि 76 कोटी रुपये खेळत्या भांडवलासाठी वापरेल जातील. हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल ही प्रिसिजन बेअरिंग उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. भारतीय प्रिसिजन बेअरिंग उत्पादन बाजारपेठेत कंपनीचा वाटा 50 ते 60 टक्के दरम्यान आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Harsha Engineers IPO share is trending on high price in gray market on 17 September 2022 

हॅशटॅग्स

#Harsha Engineers IPO(4)GRAY MARKET(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x