21 April 2025 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

HDFC Bank Share Price | मजबूत फंडामेंटल! HDFC बँक शेअर्स अल्पावधीत 45% परतावा देतील, तज्ज्ञांनी काय म्हटले?

HDFC Bank Share Price

HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. यावर्षी आतापर्यंत एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 15 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे शेअर्स जबरदस्त मूल्यांकनावर ट्रेड करत आहेत. ( एचडीएफसी बँक अंश )

तसेच या बँकेचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीवरून 45 टक्के अधिक वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 1,432.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे शेअर्स ‘आउटपरफॉर्म’ करत आहेत. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स पुढील काळात 2100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 21 मार्च 2024 रोजी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1446 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे शेअर्स अल्पावधीत 45 टक्के नफा कमावून देऊ शकतात. या वर्षी आतापर्यंत एचडीएफसी बँकेचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले आहे. मागील एका वर्षभरात या बँकेच्या शेअरमध्ये 8-9 टक्के घसरण पहायला मिळाली होती. या बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 18 टक्के डिस्काउंटवर ट्रेड करत आहेत.

बर्नस्टीन फर्मच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे मूल्यांकन अतिशय आकर्षक वाटत आहे. एचडीएफसी बँक आपल्या उपकंपन्यांमधील शेअर विक्रीद्वारे वार्षिक कमाईच्या तुलनेत 25 टक्के भांडवल जमा करू शकते. शेअरमधील अल्पकालीन अस्थिरतेला सामोरे जाण्यासाठी बँकेने उपकंपनीचे भाग भांडवल विकण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेची मूलभूत तत्त्वे चांगली असून ही बँक भारतातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. एचडीएफसी बँक जगातील सर्वात मूल्यवान बँकांच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर येते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC Bank Share Price NSE Live 26 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HDFC Bank Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या