22 November 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक! 5G कंपनीचा स्वस्त शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका

HFCL Share Price

HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19,389.52 कोटी रुपये आहे. बुधवारी एचएफसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 134.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच या कंपनीने इलेक्ट्रॉनिक फ्यूज, थर्मल साईट्ससाठी टी कोर, लाइट मशीन गन आणि असॉल्ट रायफल्ससाठी थर्मल वेपन साइट्स, विविध रेंज आणि ॲप्लिकेशन्ससाठी ग्राउंड सर्व्हिलन्स रडार यासह विविध अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान स्वदेशी डिझाइन विकसित केले आहेत. ( एचएफसीएल कंपनी अंश )

याशिवाय कंपनीने तोफखाना दारुगोळ्यासाठी स्वदेशी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक फ्यूजची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेतली आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 0.77 टक्के घसरणीसह 133.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत या सर्व वस्तूंचे सर्व बौद्धिक संपदा अधिकार एचएफसीएल कंपनीकडे आहेत. स्वदेशी बनावटीच्या फ्यूजच्या निर्यातीबाबत कंपनीने चर्चा सुरू केली आहे. याशिवाय, संरक्षण आणि सुरक्षा दलांची महत्त्वपूर्ण माहिती, पाळत ठेवणे आणि शोध आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, एचएफसीएल कंपनीने अत्याधुनिक रडार टेक्नॉलॉजी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. एचएफसीएल कंपनीची उपकंपनी, Raddef Private Limited अत्याधुनिक रडार आणि RF सोल्यूशन्समध्ये विशेषज्ञ मानली जाते. या कंपनीने विविध प्रकारच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ग्राउंड आणि कोस्टल सर्व्हिलन्स रडारची रचना आणि निर्मिती केली आहे.

जून तिमाहीत एचएफसीएल कंपनीचा महसूल 1158 कोटी रुपयेवरून 4 टक्क्यांनी कमी होऊन 995 कोटीवर आला आहे. याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 76 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 111 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6,776 कोटी रुपये आहे. यामधे नेटवर्क सेवेचे 3,092 कोटी रुपये, उत्पादनाचे 1,673 कोटी रुपये आणि O&M संबंधित कामाचे 2,011 कोटी रुपये मूल्याचे काम प्रलंबित आहे.

या कंपनीकडे एकूण 5 उत्पादन सुविधा आणि 3 R&D केंद्रे आहे. ही कंपनी 45 पेक्षा जास्त देशांमध्ये व्यवसाय करते. एचएफसीएल लिमिटेड ही कंपनी दूरसंचार पायाभूत सुविधा सक्षम करणारी कंपनी आहे. ही कंपनी दूरसंचार उपकरणे, ऑप्टिकल फायबर आणि ऑप्टिक फायबर केबल बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी दूरसंचार, रेल्वे, संरक्षण, स्मार्ट सिटी आणि पाळत ठेवण्याच्या अनुप्रयोगांसाठी टर्नकी सोल्यूशन्स ऑफर करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HFCL Share Price NSE Live 01 August 2024.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x