22 November 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

HFCL Share Price | रिलायन्सची गुंतवणूक असलेला 5G संबंधित कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, संयम श्रीमंत बनवेल

HFCL Share Price

HFCL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 113.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पाळतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 110.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच एचएफसीएल कंपनीला भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने 4G आणि 5G नेटवर्क उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी 179 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. एचएफसीएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार आर्थिक वर्ष 2022-23 मधील डिसेंबर तिमाहीत 7064 कोटी रुपये होते. या तिमाहीत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 7,678 कोटी रुपये झाला आहे. एचएफसीएल कंपनीला मिळालेल्या 5G टेलिकॉम नेटवर्किंग उपकरणांच्या ऑर्डरचे एकूण मूल्य 623 कोटी रुपये आहे.

एंजेल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, एचएफसीएल स्टॉक पुढील काळात 120 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. टेक्निकल चार्टवर एचएफसीएल स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. गुंतवणूक सल्लागारांनी एचएफसीएल स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 104 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 140-150 रुपये टार्गेट प्राईससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत एचएफसीएल कंपनीचा PAT मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 18.88 टक्के घसरणीसह 82.43 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा PAT 101.62 कोटी रुपये नोंदवला गेला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत एचएफसीएल कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 4.93 टक्के घसरणीसह 1032.31 रुपये महसूल कमावला आहे. मागील वर्षी डिसेंबर 2022 तिमाहीत एचएफसीएल कंपनीने 1,085.84 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. एचएफसीएल कंपनीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपची देखील हिस्सेदारी आहे.

एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीच्या IPO ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार एचएफसीएल लिमिटेड कंपनीने 8.19 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. एचएफसीएल आणि एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये Vinson Brothers, NextWave Communications आणि अनंत नाहाटा सामील आहेत. एक्झिकॉम टेली-सिस्टम्स कंपनीचा IPO या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी लाँच होईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HFCL Share Price NSE Live 21 February 2024.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x