5 November 2024 9:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON
x

HFCL Share Price Today | या कंपनीत मुकेश अंबानींचा हिस्सा आणि ऐकावर एक कॉन्ट्रॅक्ट देण्यास सुरुवात, 65 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी

HFCL Share Price

HFCL Share Price Today | ‘एचएफसीएल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 64.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आजही स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनाक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 65.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरुवारी हा शेअर 3.93% वाढीसह 67.45 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ होण्याचे कारण म्हणजे ‘एचएफसीएल लिमिटेड’ कंपनीला मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीकडून ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 65.72 कोटी रुपये असून याचा सकारात्मक परिणाम स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे.

HFCL Stock Price Today on NSE & BSE

एचएफसीएल कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, “एचएफसीएल कंपनीच्या एचएफसीएल लिमिटेड या उप कंपनीला रिलायन्स रिटेल लिमिटेड कंपनीकडून ऑप्टिकल फायबर केबल्सचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळवली आहे. या ऑर्डरचे मूल्य 65.72 कोटी रुपये आहे. एचएफसीएल लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 8,927 कोटी रुपये आहे.

ही कंपनी भारतातील दिग्गज दूरसंचार ऑपरेटरपैकी एक मानली जाते. 12 एप्रिल 2023 रोजी एचएफसीएल लिमिटेड कंपनीने त्यांना ऑप्टिकल फायबर केबल्सच्या पुरवठ्यासाठी रिलायन्स प्रोजेक्ट्स आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीकडून नवीन वर्क ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली होती.

एचएफसीएल लिमिटेडच्या निवेदनानुसार ही वर्क ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर 2023 पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत चौथ्या तिमाहीचे आणि 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल तपासले जाणार आहे.

मल्टीबॅगर परतावा
एचएफसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी 64.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 28.15 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. म्हणजेच या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 142.55 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 10.84 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 491.42 टक्के परतावा कमावला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीचे शेअर्स 4.34 टक्के कमजोर झाले आहेत. तर YTD आधारावर या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 14.34 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HFCL Share Price Today on 04 May 2023.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x