15 January 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

HFCL Share Price | या कंपनीत मुकेश अंबानींची गुंतवणूक! HFCL शेअरने 3 वर्षात 8 पट परतावा दिला, कंपनीवर ऑर्डर्सचा पाऊस पडतोय

HFCL Share Price

HFCL Share Price | HFCL लिमिटेड कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्के नफा कमावून दिला आहे. HFCL लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6585 कोटी रुपये आहे. HFCL लिमिटेड या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला भारतीय दूरसंचार सेवा कंपनीकडून 83 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे.

HFCL लिमिटेड कंपनीने सेणी दिलेल्या माहितीनुसार HFCL लिमिटेड कंपनीला 83 कोटी रुपये मूल्याचे ऑप्टिकल फायबर केबल पुरवण्याचे नवीन काम मिळाले आहे. या ऑर्डरची पूर्तता नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्याचे बंधन कंपनीवर आहे. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी HFCL लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के वाढीसह 74.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

HFCL म्हणजेच हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अग्रणी मानली जाते. कंपनी आपल्या ग्राहकांना दूरसंचार पायाभूत सुविधांचा विकास, प्रणाली एकत्रीकरण आणि उत्पादनांचा पुरवठा करण्याचे काम करते. HFCL कंपनीच्या उत्पादनांमध्ये हाय एंड टेलिकॉम उपकरणे, ऑप्टिकल फायबर आणि ऑप्टिकल फायबर केबल सामील आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये HFCL लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. मात्र आज स्टॉकमध्ये मजबूत खरेदी झाली आहे.

मागील 5 दिवसात HFCL लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.38 टक्के कमजोर झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 67 रुपयेवरून वाढून 72 रुपयेवर पोहचली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.21 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HFCL लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,000 कोटी रुपये आहे. मागील 5 वर्षांत HFCL लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्के नफा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी HFCL लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक आठ पट वाढून 74 रुपये किमतीवर पोहोचला आहे. HFCL लिमिटेड कंपनीने 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HFCL Share Price today on 14 September 2023.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x