29 April 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 30 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | ऑटो कंपनीचा मल्टिबॅगर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
x

Hindenburg Report Vs Adani Group | हिंडेनबर्गच्या रिपोर्टने उघड झाले रहस्यमय चिनी कनेक्शन, या व्यक्तीशी जोडले अदानींचे संबंध

Hindenburg Report Vs Adani Group

Hindenburg Report Vs Adani Group | अदानी समूहावरील अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालात आता एक नवा कोन समोर आला आहे. हिंडेनबर्गने याला चिनी कोनाशी जोडले आहे. अदानी समूहाने अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत, याकडे हिंडेनबर्ग यांनी लक्ष वेधले आहे. चिनी नागरिकाशी (चांग चुंग-लिंग) अदाणींचा संबंध स्पष्ट करण्याची हिम्मतही अदाणींनी केलेला नाही.

रिसर्च फर्म ने प्रश्न केला आहे की चांग चुंग-लिंग यांच्याशी अदाणींचा काय संबंध आहे? किंवा विनोद अदानी यांच्याशी त्यांचे संबंध आहेत का? त्यावर अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्याचबरोबर अदानी समूहाच्या गैरव्यवहारांबाबतचा आपला अहवाल हा भारतावरील सुनियोजित हल्ला असल्याचा आरोपही हिंडेनबर्ग कंपनीने फेटाळून लावला आहे. यावर हिंडेनबर्ग म्हणाले, ‘फसवणुकीला राष्ट्रवादाने झाकून ठेवता येणार नाही. सोमवारी अदानी समूहाने ४१३ पानांच्या उत्तराला प्रतिउत्तर दिले. मात्र त्यात मुख्य प्रश्नांना उत्तर देण्याची हिम्मतच अदानी ग्रुपकडे नसल्याचं पाहायला मिळालं.

चीनी कनेक्शन नेमकं काय?
हिंडेनबर्गच्या ताज्या निवेदनानुसार, चांग चुंग लिंग ऊर्फ लिंगो चांग संचालित गुडामी इंटरनॅशनल या कंपनीचा ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याशी संबंध आहे. ऑगस्टा वेस्टलँड हा अत्यंत गाजलेला घोटाळा आहे, ज्यात हेलिकॉप्टर खरेदीदरम्यान भ्रष्टाचार उघडकीस आला होता. हिंडेनबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांग चुंग लिंग यांचा मुलगा अदानी समूहाच्या पीएमसी प्रकल्पातील प्रमुख कंत्राटदार होता. 2002 मध्ये अदानी एक्सपोर्ट्सने (नंतर अदानी एंटरप्रायजेस असे नाव बदलले) गुडामी इंटरनॅशनल संबंधित पक्ष असल्याचे उघड केले.

अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी पॉवरकडून रोख गैरव्यवहार
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) २०१४ च्या अहवालातही चांग चुंग-लिंग यांचे नाव असल्याचे हिंडेनबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे. अदानी समूहाने अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी पॉवर या सूचीबद्ध कंपन्यांच्या रोख रकमेचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डीआरआयच्या तपास नोंदीनुसार, गौतम अदानी इलेक्ट्रोजेन इन्फ्रा होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. ज्या दिवशी त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला, त्या दिवशी त्यांच्या जागी विनोद अदानी यांची नियुक्ती करण्यात आली. एवढेच नव्हे तर अनेक गुन्हेगारी तपासात गुदामी संचालक/भागधारक चांग चुंग-लिंग यांना डीआरआयने अदानी समूहाच्या कंपन्यांचे संचालक म्हणून संबोधले आहे. चांग चुंग-लिंग यांचे अदानी समूहाशी सखोल नाते आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hindenburg Report Vs Adani Group exposed China connection with Adani check details on 01 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Hindenburg Report Vs Adani Group(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या